Homeऔरंगाबादभूजल पातळी खालावत असतानाही लासूर नाका परिसरातून मोठ्या प्रमाणात पाण्याची विक्री सुरू!...

भूजल पातळी खालावत असतानाही लासूर नाका परिसरातून मोठ्या प्रमाणात पाण्याची विक्री सुरू! प्रशासनाचे दुर्लक्ष की मूक संमती?

भूजल पातळी खालावत असतानाही लासूर नाका परिसरातून मोठ्या प्रमाणात पाण्याची विक्री सुरू! प्रशासनाचे दुर्लक्ष की मूक संमती?

आत्ताच एक्सप्रेस 
गंगापूर/प्रतिनिधी/ गंगापूर शहर व परिसरातील भूजल पातळी दिवसेंदिवस खालावत असताना लासूर नाका परिसरात बोअरवेलमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा करून मोठमोठ्या टँकरद्वारे पाण्याची विक्री केली जात असल्याचा गंभीर प्रकार निदर्शनास येत आहे. भूजल पातळी कमी होत असतानाही मोठ्या क्षमतेचे टँकर भरून जात असल्याने या अनियंत्रित पाणी उपशामुळे येणाऱ्या काळात गंगापूर शहरासह छत्रपती संभाजीनगर रोड परिसरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.
         आज सुरू असलेला हा अनियंत्रित पाणी उपसा भविष्यात शहराच्या पाणी उपलब्धतेवर परिणाम करू शकतो. त्यामुळे नागरिकांच्या हक्काच्या पाण्याचे स्रोत सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करणे आवश्यक आहे. बोअरवेलधारकांकडून मोठ्या प्रमाणात पाण्याची व्यावसायिक विक्री होत असताना या उपशावर कोणाचे नियंत्रण आहे? याची तपासणी कोण करीत आहे? तसेच या पाणी उपशासाठी आवश्यक परवानग्या आहेत का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
         विशेष म्हणजे, सदर बोअरवेल अद्याप प्रशासनाने हस्तगत केलेल्या नसल्याची बाब निदर्शनास आली आहे. त्यामुळे या बोअरवेलमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा करून टँकरद्वारे पाण्याची विक्री सुरू असताना प्रशासनाचे यावर कोणतेही नियंत्रण आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. संबंधित बोअरवेल प्रशासनाच्या ताब्यात घेण्याबाबत किंवा पाणी उपशावर नियंत्रण आणण्याबाबत अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली दिसून येत नाही. त्यामुळे या प्रकाराची तातडीने चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
         या गंभीर बाबीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी  यापूर्वी मा. आमदार महोदय यांच्याकडे लेखी पत्राद्वारे निवेदन सादर केले होते. तसेच पंचायत समिती, गंगापूर येथील मा. गटविकास अधिकारी यांनाही दिनांक ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी लेखी पत्र देऊन टँकरद्वारे सुरू असलेल्या पाणीपुरवठ्याची पारदर्शक माहिती उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.
         तसेच लासूर नाका परिसरातील पाणी उपशाच्या प्रकाराबाबतही चौकशी करून आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र, वारंवार पत्रव्यवहार करूनही अद्याप समाधानकारक कार्यवाही झालेली नसल्याने नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
प्रशासनाला काही महत्त्वाचे प्रश्न :-
१. गंगापूर शहर व परिसरातील संबंधित बोअरवेलमधून किती प्रमाणात पाण्याचा उपसा केला जात आहे?
२. सदर बोअरवेल प्रशासनाने अद्याप हस्तगत का केलेल्या नाहीत?
३. दररोज किती मोठे टँकर भरून या परिसरातून बाहेर जात आहेत?
४. संबंधित बोअरवेलधारकांकडे पाण्याची व्यावसायिक विक्री करण्यासाठी आवश्यक परवानग्या आहेत का?
५. भूजल पातळी खालावत असताना या पाणी उपशावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने कोणती उपाययोजना केली आहे?
६. या पाणी उपशामुळे भविष्यात गंगापूर शहर व संभाजीनगर रोड परिसरातील नागरिकांच्या पाणी उपलब्धतेवर परिणाम झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार?
७. आमदार महोदयांना व गटविकास अधिकाऱ्यांना लेखी पत्र देऊनही अद्याप प्रत्यक्ष चौकशी व कार्यवाही का झालेली नाही? या गंभीर प्रश्नावर जिल्हा प्रशासन काय कारवाई करणार याकडे संपूर्ण तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

 

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments