Homeऔरंगाबादबालकांच्या कुंचल्यातून साकारले विश्वशांतीचे रंग 

बालकांच्या कुंचल्यातून साकारले विश्वशांतीचे रंग 

बालकांच्या कुंचल्यातून साकारले विश्वशांतीचे रंग 

लायन्स क्लब ऑफ जालनाच्या पोस्टर स्पर्धेत १५० विद्यार्थ्यांचा सहभाग
जालना/प्रतिनिधी/ जागतिक शांतता, बंधुभाव आणि परस्पर सहिष्णुतेचे रंग कागदावर उतरवत जालन्यातील बालकलाकारांनी रविवार, दि. १ नोव्हेंबर रोजी आपल्या प्रतिभेची झलक दाखवली. लायन्स क्लब ऑफ जालनाच्यावतीने राष्ट्रीय हिंदी विद्यालयात आयोजित विश्वशांती पोस्टर स्पर्धेत विविध शाळांतील तब्बल १५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ‘मानवतावादी सामंजस्य’ हा स्पर्धेचा विषय होता.
      स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्ष डॉ. गिरीश पाकणीकर, सचिव गणेश कामड आणि कोषाध्यक्ष महावीर गिल्डा उपस्थित होते. स्पर्धेचा निकाल लवकरच जाहीर होईल आणि मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण होईल. पहिल्या १० उत्कृष्ट कलाकृतींची निवड केली जाणार असून, त्या लायन्स इंटरनॅशनलच्या जागतिक पीस पोस्टर स्पर्धेसाठी पाठवल्या जातील. तेथे निवड झालेल्या कलाकृतींना ५ हजार डॉलरचे बक्षीस मिळेल, तसेच विद्यार्थ्यांच्या प्रवासाचा खर्च क्लब करणार आहे.
       उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय हिंदी विद्यालयाचे मुख्याध्यापक मनीष अग्रवाल, शिक्षक सतीश संचेती, मिलिंद दुसे, मनीष देशमुख, अरविंद देशपांडे, ताज अहमद खान, श्रीमती काजल मोरे, प्रशांत तुल्ले, सुरेश वाढेकर, व्ही. आर. ठोंबरे, पी. के. खरात, राजेभाऊ मगर आणि अशोक माधवले यांनी विशेष परिश्रम घेतले. जालन्यातील कलाप्रेमी, कला शिक्षक, शाळा आणि मान्यवरांचेही मोलाचे योगदान लाभले. शाळेचे अध्यक्ष सतीश बगडिया यांचे विशेष सहकार्य मिळाले.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments