Homeऔरंगाबाददेगलूर महाविद्यालयातील प्रा. डॉ .संजय पाटील सेवानिवृत्त

देगलूर महाविद्यालयातील प्रा. डॉ .संजय पाटील सेवानिवृत्त

देगलूर महाविद्यालयातील प्रा. डॉ .संजय पाटील सेवानिवृत्त

देगलूर/प्रतिनिधी/  येथील अडत व्यापारी शिक्षण संस्था संचलित देगलूर महाविद्यालयातील तत्वज्ञान विभागप्रमुख  पर्यावरणीय नीतिशास्त्राचे अभ्यासक प्रा. डॉ. संजय हाणमंतराव पाटील हे नियत वयोमानानुसार आज दि.३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सेवानिवृत्त झाले आहेत.
        यानिमित्त अ.व्या.शिक्षण संस्था व देगलूर महाविद्यालयाच्यावतीने सेवापूर्ती गौरव सोहळा आयोजित करून निरोप देण्यात आला. त्यांनी एकूण 32वर्षे 10 महिने इतकी प्रदीर्घ सेवा केली आहे.
त्यांचा सेवानिवृती बद्दल अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील बेम्बरेकर, उपाध्यक्ष जनार्धन चिद्रावार, सचिव डॉ. कर्मवीर उनग्रतवार, सहसचिव राजकुमार महाजन, कोषाध्यक्ष विलास तोटावार यांच्यासह संस्थेच्या कार्यकारिणी मंडळाचे सदस्य सूर्यकांत नारलावार, देवेंद्र मोतेवार, गंगाधरराव जोशी, रवींद्रअप्पा द्याडे, चंद्रकांत नारलावार, गुरुराज चिद्रावार, विजय उनग्रतवार, यांच्यासह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन खताळ , उपप्राचार्य डॉ. अनिल चिद्रावार, उपप्राचार्य डॉ एम एम चमकुडे उपप्राचार्य डॉ व्ही जी शेरीकर , पर्यवेक्षक संग्राम पाटील , कार्यालय अधीक्षक गोविंद जोशी यांनी भावी आयुष्याबाबत शुभेच्छा दिल्या.
       याप्रसंगी महाविद्यालयातील शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.संजय देबडे यांनी केले तर आभार प्रा. संग्राम पाटील यानी मानले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, पाटील सरांचे कुटुंब, नातेवाईक व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments