Tuesday, September 29, 2026
Homeऔरंगाबादरिपब्लिकन सेनेची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न,दोन पदाधिकाऱ्यांकडून उमेदवारीची मागणी

रिपब्लिकन सेनेची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न,दोन पदाधिकाऱ्यांकडून उमेदवारीची मागणी

रिपब्लिकन सेनेची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न,दोन पदाधिकाऱ्यांकडून उमेदवारीची मागणी

आत्ताच एक्सप्रेस 

गंगापूर/प्रतिनिधी/ महाराष्ट्र विधानपरिषद पदवीधर मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन सेनेच्या वतीने उमेदवार निश्चित करण्यासंदर्भातील महत्त्वपूर्ण बैठक छत्रपती संभाजीनगर येथे रिपब्लिकन सेनेचे लोकसभा क्षेत्र अध्यक्ष मा. के. व्ही. मोरे  यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. आगामी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत रिपब्लिकन सेनेच्या वतीने उमेदवारी मिळावी यासाठी पक्षातील दोन पदाधिकाऱ्यांनी आपली उमेदवारीची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे पक्षाकडून अंतिम उमेदवारी नेमकी कोणाच्या पारड्यात पडणार, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. बैठकीमध्ये संभाव्य उमेदवार, संघटनात्मक परिस्थिती, निवडणुकीची तयारी तसेच पदवीधर मतदारसंघात पक्षाची भूमिका आणि आगामी नियोजन याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीतील चर्चेचा आणि उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या मतांचा अहवाल प्रदेश कमिटीसमोर सादर करण्यात येणार असून, प्रदेश कमिटीच्या निर्णयानंतर उमेदवारीबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती लोकसभा क्षेत्र अध्यक्ष मा. के. व्ही. मोरे  यांनी बैठकीत दिली. तसेच उमेदवारीबाबत अंतिम निर्णय झाल्यानंतर रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सर सेनानी आनंदराज आंबेडकर  यांच्याकडून अधिकृत उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात येईल, असेही मा. के. व्ही. मोरे  यांनी स्पष्ट केले.

या बैठकीमुळे रिपब्लिकन सेनेच्या पदवीधर मतदारसंघातील संभाव्य निवडणूक भूमिकेला महत्त्व प्राप्त झाले असून, पक्षाचा अधिकृत उमेदवार कोण असणार, याबाबतची उत्सुकता वाढली आहे. प्रदेश कमिटीच्या अहवालानंतर होणाऱ्या निर्णयाकडे आता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच पदवीधर मतदारांचे लक्ष लागले आहे.
या महत्त्वपूर्ण बैठकीस मिलिंद मोकळे, अनिल मगरे, अजय बनसोडे, बबन साठे, मधुकर माघाडे, राहुल गवळी, प्रवीण शिंदे, राजेश देशमुख, आसजत खान, अनिल खरात, राजू भालेराव, राजू मगरे, अशोक शिंदे, पप्पू कांबळे यांच्यासह रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments