जालन्याच्या महिला पोलीस कर्मचारी पुनम भट्ट यांच्या कर्तव्यनिष्ठेचा भारत सरकारकडून गौरव
टेंभुर्णी :- जालना जिल्हा पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. जिल्हा पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या पुनम पुरणचंद्र भट्ट यांना भारत सरकारकडून ‘उत्कृष्ट सेवा पदक’ प्रदान करण्यात आले आहे. या सन्मानामुळे जालना पोलीस दलात आनंदाचे वातावरण आहे.
पोलीस अधीक्षक तेजबीर सिंग संधू यांनी पत्राद्वारे हा सन्मान जाहीर करून पदक प्रदान केले. कर्तव्याप्रती असलेली निष्ठा, प्रामाणिकपणा, शिस्त आणि कार्यतत्परता यांची दखल घेत केंद्र
सरकारने हा पुरस्कार दिला आहे.
पुनम भट्ट यांनी आपल्या सेवाकाळात कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हे प्रतिबंध व तपास आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सेवा बजावण्यात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. वरिष्ठांनी सोपविलेल्या तत्पर जबाबदाऱ्या त्यांनी कौशल्याने पार
पाडल्या आहेत.