Saturday, June 20, 2026
Homeऔरंगाबादगाव पंचायत उभी करा, आत्मनिर्भर गाव घडवा; देशहितासाठी भाजपमध्ये जाणार" – माजी...

गाव पंचायत उभी करा, आत्मनिर्भर गाव घडवा; देशहितासाठी भाजपमध्ये जाणार” – माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांची मोठी घोषणा

गाव पंचायत उभी करा, आत्मनिर्भर गाव घडवा; देशहितासाठी भाजपमध्ये जाणार” – माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांची मोठी घोषणा

कन्नड/प्रतिनिधी/  कन्नड येथे झालेल्या खूनप्रकरणाच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी कायदा-सुव्यवस्था, ग्रामीण सुरक्षा, आत्मनिर्भर गावांची संकल्पना आणि आपल्या पुढील राजकीय वाटचालीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. अभिष्टचिंतन सोहळ्यात बोलताना त्यांनी सरकारवर टीका करत गावकऱ्यांनी संघटित होऊन गावांचे संरक्षण करण्याचे आवाहन केले. याचवेळी “देशहितासाठी आपण सर्व भारतीय जनता पक्षात जाणार आहोत,” अशी तालुक्याच्या राजकारणात खळबळ उडवणारी मोठी घोषणा त्यांनी केली.
कन्नडमधील खूनप्रकरणाचा उल्लेख करत माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी देशातील कायदा-सुव्यवस्थेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. “आज कोणताही माणूस सुरक्षित नाही. पोलिस यंत्रणांवर मोठा ताण असून अनेक ठिकाणी मनुष्यबळाची कमतरता आहे. त्यामुळे भविष्यात गावांच्या सुरक्षेची जबाबदारी गावकऱ्यांनाच घ्यावी लागेल,” असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रायभान जाधव विकास आघाडीचे तालुकाध्यक्ष राजु तुपे यांनी केले व आभार प्रदर्शन सुर्यभान दहेतकर या वेळी शनि भक्त सुखदेव महाराज नेवपूर उपस्थित होते व अदित्य जाधव व तालुक्यातून हर्षवर्धन जाधव समर्थक उपस्थित होते
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments