Saturday, June 20, 2026
Homeऔरंगाबादखुलताबाद तहसील कार्यालयासमोर मनसेच्या पाठपुराव्यामुळे उपोषण मागे; १५ दिवसांत रस्ता मोकळा करण्याचे...

खुलताबाद तहसील कार्यालयासमोर मनसेच्या पाठपुराव्यामुळे उपोषण मागे; १५ दिवसांत रस्ता मोकळा करण्याचे तहसीलदारांचे लेखी आश्वासन

खुलताबाद तहसील कार्यालयासमोर मनसेच्या पाठपुराव्यामुळे उपोषण मागे; १५ दिवसांत रस्ता मोकळा करण्याचे तहसीलदारांचे लेखी आश्वासन

​खुल्ताबाद/प्रतिनिधी/ खुलताबाद तालुक्यातील मौजे भटजी येथील वडिलोपार्जित शेतजमिनीत जाण्या-येण्यासाठी रस्ता मिळावा या प्रमुख मागणीसाठी गेल्या तीन दिवसांपासून तहसील कार्यालयासमोर सुरू असलेले आमरण उपोषण अखेर प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) जिल्हाध्यक्ष राजू पाटील घोरपडे, बाबासाहेब फुलारे.रत्नाकर वाकळे.यांचे सह
पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्याशी सकारात्मक चर्चा घडवून आणली. प्रशासनाने १५ दिवसांच्या आत रस्ता मोकळा करून देण्याचे लेखी पत्र दिल्यानंतर तिसऱ्या दिवशी उपोषणकर्त्यांना ज्यूस पाजून उपोषणाची सांगता करण्यात आली.​प्रशासनाचे लेखी पत्र आणि आंदोलन मागे
मिळालेल्या माहितीनुसार, मौजे भडजी (ता. खुल्ताबाद, जि. छत्रपती संभाजीनगर) येथील गट नंबर ६९ मधील आपल्या वडिलोपार्जित शेतजमिनीत जाण्यासाठी गट नं. १६६, १६७, १६८, १६९ मधून रस्ता मिळवून देण्यात यावा, या मागणीसाठी बाजीराव शेकू वाकळे. या शेतकरींनी दिनांक ३ जून २०२६ पासून खुलताबाद तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले होते. उपोषणाचा आज तिसरा दिवस होता. उपोषणकर्त्याची प्रकृती खालावण्यापूर्वी मनसे नेत्यांनी या प्रकरणात मध्यस्थी केली.मनसेचे
पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी संतोष गोरड. तहसीलदार ची भेट घेऊन तातडीने मार्ग काढण्याची विनंती केली.यावर तहसीलदार यांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पुढील १५ दिवसांच्या आत संबंधित रस्ता मोकळा करून देण्याचे लेखी आश्वासन दिले.हे लेखी पत्र उपोषणकर्त्यांना सुपूर्द करण्यात आले.
​अन्यायाविरुद्ध मनसेचा खंबीर पाठिंबा शेतकऱ्यांच्या हक्काच्या रस्त्यासाठी मनसेचे पदाधिकारी
व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रशासनाकडे जोरदार पाठपुरावा केला.लेखी आश्वासन मिळाल्यानंतर उपोषणकर्ते बाजीराव वाकळे यांना ज्यूस पाजून त्यांचे उपोषण अधिकृतपणे मागे घेण्यात आले. यावेळी मनसे पदाधिकारी, स्थानिक नागरिक आणि महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.दिलेल्या मुदतीत प्रशासनाने रस्ता मोकळा करून दिला नाही, तर मनसे स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी कार्यकर्त्यांकडून देण्यात आला.प्रशासनाच्या या सकारात्मक भूमिकेमुळे वाकळे.
कुटुंब आणि स्थानिक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments