Monday, June 22, 2026
Homeऔरंगाबादहिम्मत असेलतर मोदी सरकारवर दबाव टाकुन दिल्लीत गोहत्या कायदा करण्यासाठी  हिंदुत्ववादी नेत्यांनी...

हिम्मत असेलतर मोदी सरकारवर दबाव टाकुन दिल्लीत गोहत्या कायदा करण्यासाठी  हिंदुत्ववादी नेत्यांनी मागणी करावी उगाच दोन समाजामध्ये तेढ निर्माण करुन गल्लीत गोंधळ घालु नये 

हिम्मत असेलतर मोदी सरकारवर दबाव टाकुन दिल्लीत गोहत्या कायदा करण्यासाठी  हिंदुत्ववादी नेत्यांनी मागणी करावी उगाच दोन समाजामध्ये तेढ निर्माण करुन गल्लीत गोंधळ घालु नये     
                  
बीड/प्रतिनिधि/ गाई ही हिंदू बांधवांची आस्था श्रध्दा आहे हिंदू बांधव गाईला देवीचे रुप मानतात कोणाच्याही धार्मिक भावना दुखवल्या जावू नये म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी गाईला राष्ट्रीयपशु घोषित करावे व गोहत्या कायदा देशपातळीवर लागूं करावा.
      गोहत्या थांबवायची असेल तर फक्त गोरगरीब शेतकरी व खाटकावर कार्यवाही करून कसे चालणार, गाई बैल विकणा-या व्यापा-यांवर पण कार्यवाही व्हायला पाहिजे गाई बैल पकडून देणारे व नंतर मांडवली करून हफते खाणा-या डुपलीकेट गोरक्षकांवर पण मकोका लावायला हवे, छावन्या मधून जनावरे गायब करून विकणा-यावर किंवा छावन्याध्ये गाईंचे हाल हाल करून उपाशी पोटी मारणा-यांवर पण मकोका लावावा व राज्यातच  नव्हे संपूर्ण देशात गोहत्या कायदा करून भारतामध्ये हिंदू मालकांचे बीफ कत्तलखाने कंपन्यामध्ये गोहत्या करुन गाईचे मटन विदेशात निर्यात केले जाते अशा बीफ कंपन्यांवर पण सुद्धा बंदी घालून कायदेशीर कार्यवाही करावी.
     हिम्मत असेलतर मोदी सरकारवर दबाव टाकुन दिल्लीत गोहत्या कायदा करण्यासाठी हिंदुत्ववादी नेत्यांनी मागणी करावी उगाच दोन समाजामध्ये तेढ निर्माण करुन गावं गल्लीत मोर्चे काढून गोंधळ घालु नये व स्वताच्या राजकारणासाठी आम जनतेला वेठीस धरु नये असेल हिम्मत तर आमच्या सोबत हिंदुत्ववादी नेते  करणार का? नरेंद्र मोदीजी व अमित शाह यांच्याकडे मागणी व केंद्र सरकारवर दबाव टाकणार का? का आपला असला तर बबडया आणि दुस-याचं कारटं समजतात असे तर नव्हे ना.
     देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यापुर्वी सामाजिक कार्यकर्ते ॲड. इलियास इनामदार यांनी ऑक्टोबर 2024 ला व मार्च 2025 ला निवेदनाद्वारे मागणी केली होती परंतु आज तारखेपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी याविषयी कसलीच हालचाल केलेली दिसत नाही.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या विषयी पुन्हा निवेदन पाठवणार आहे अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते ॲड.  इलियास इनामदार यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments