Sunday, April 12, 2026
Homeऔरंगाबादजालना येथील काँग्रेस पक्षाच्या " संघटन सृजन अभियान" अंतर्गत मेळाव्यास जालना जिल्हातील...

जालना येथील काँग्रेस पक्षाच्या ” संघटन सृजन अभियान” अंतर्गत मेळाव्यास जालना जिल्हातील काँग्रेस च्या आजी माजी पदाधिकरी आणि कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन 

जालना येथील काँग्रेस पक्षाच्या ” संघटन सृजन अभियान” अंतर्गत मेळाव्यास जालना जिल्हातील काँग्रेस च्या आजी माजी पदाधिकरी आणि कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन 
जालना/प्रतिनिधी/  अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीकडुन देशभरात  “संघटन सृजन अभियान” हाती घेतले असून, महाराष्ट्रात या अभियानात पक्षाला तळागाळापर्यंत मजबूत करण्याचा मानस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा असून हे त्यांचे महत्वपूर्ण  पाऊल ठरणार आहे.
   या मेळाव्यास अखिल भारतीय कॉंग्रेस ने पक्ष निरीक्षक म्हणून निवड केलेले गुजरातचे माजी आ हिंमतसिंह पटेल व जालनाचे खासदार डाॅ कल्याणराव काळे,तसेच प्रदेश काँग्रेस कमिटीकडुन मराठवाडा निरीक्षक म्हणून माजी प्रदेशाध्यक्ष आ नानाभाऊ पटोले, माजी आ सुरेश देशमुख,प्रदेश पदाधिकारी अब्दुल हाफिज यांच्यासह जिल्हा पक्ष प्रभारी अशोक पाटील निलंगेकर, आ राजेश राठोड, प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र राख, कल्याणराव दळे यांच्या प्रमुख उपस्थितीत १२ एप्रिल रविवार रोजी  दुपारी १२:३० वा.आयएमए हाॅल,राजुरी काॅर्नर शेजारी, जालना येथे आयोजित करण्यात आला असून या मेळाव्यास जालना जिल्हातील सर्व आजी- माजी प्रदेश पदाधिकारी, आजी- माजी  जिल्हाध्यक्ष, ता.अध्यक्ष, जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, जि प सदस्य, पं.स.सदस्य,नगराध्यक्ष,नगरसेवक,सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्ते यांनी जास्तीत जास्त संख्येत उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, शहराध्यक्ष अतिक खान यांनी केले आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments