Wednesday, April 8, 2026
Homeऔरंगाबादमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘नायक’ आणि ‘अर्जुन’ टीबीएमचा शुभारंभ

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘नायक’ आणि ‘अर्जुन’ टीबीएमचा शुभारंभ

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘नायक’ आणि ‘अर्जुन’ टीबीएमचा शुभारंभ

ठाणे :- मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी मानल्या जाणाऱ्या ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाचा ऐतिहासिक टप्पा आज गाठला गेला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत आज ठाणे येथे बोगदा खोदकाम करणाऱ्या अवाढव्य ‘टीबीएम’ (Tunnel Boring Machine) यंत्रांचा लाँचिंग सोहळा दिमाखात पार पडला.

यावेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, ठाणे महानगरपालिका महापौर शर्मिला पिंपळोलकर, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ.संजय मुखर्जी, अतिरिक्त महानगर आयुक्त-2 अश्विन मुद्गल, व्यवस्थापकीय संचालक मेघा इंजिनिअरींग कृष्णा रेड्डी आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकल्पाचे वर्णन “अभियांत्रिकी क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण टप्पा” असे केले. ते म्हणाले की, ठाणे बाजूकडून ‘नायक’ आणि ‘अर्जुन’ या दोन टीबीएम मशिन्सच्या साहाय्याने या भुयारी मार्गाचे काम आता प्रत्यक्ष सुरू झाले आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाद्वारे (MMRDA) राबविल्या जाणाऱ्या या प्रकल्पाची एकूण लांबी 11.84 किमी आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या या दोन समांतर बोगद्यांमुळे (Twin Tunnels) बोरिवली आणि ठाण्यातील घोडबंदर रस्ता थेट जोडले जाणार आहेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जैवविविधतेवर कोणताही विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी हा मार्ग पूर्णपणे जमिनीखाली ठेवण्यात आला आहे. प्रकल्पांतर्गत सुमारे 11 हजार झाडांचे पुनर्रोपण/लागवड केली जाणार आहे. तसेच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक 300 मीटरवर ‘क्रॉस पॅसेज’ आणि प्रगत अग्निशमन यंत्रणा बसवण्यात येणार आहे.3

या प्रकल्पाचे सर्वात मोठे यश म्हणजे वेळ आणि इंधनाची बचत. सध्या ठाणे ते बोरिवली प्रवासासाठी 90 मिनिटे लागतात, ते या बोगद्यामुळे केवळ 15 मिनिटांवर येतील. हे अंतर 23 किमी वरून 12 किमीपर्यंत कमी होईल. नाशिक, कल्याण आणि नवी मुंबईकडून येणारी वाहने ठाणे शहराला वळसा घालून थेट या बोगद्यात प्रवेश करू शकतील. घोडबंदर रस्त्यावरील वाहतुकीचा ताण यामुळे लक्षणीयरित्या कमी होणार आहे, असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी या बोगद्याची रचना पूर्णपणे जमिनीखाली असल्याने, जैवविविधतेवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही याची खात्री केली गेली आहे. भरपाई वृक्षारोपणाचा (Compensatory Plantation) एक भाग म्हणून सुमारे 11 हजार झाडे लावली जातील, असे सांगून ते पुढे म्हणाले की, हा प्रकल्प आगामी ‘ठाणे कोस्टल रोड’ आणि इतर प्रमुख प्रादेशिक रस्ते जाळ्यांशी (Road Networks) एकात्मिक स्वरूपात जोडला जाणार असल्याने, राज्याच्या आर्थिक प्रगतीला आणि प्रादेशिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे. त्याचबरोबर या प्रकल्पामुळे ठाण्यातील वाहतुकीसाठी थेट पर्यायी मार्ग (Bypass) उपलब्ध होणार असून, घोडबंदर रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे. वेळ आणि इंधनाची बचत होवून प्रत्येक प्रवासात 75 मिनिटांपर्यंतची बचत होणार आहे त्यामुळे इंधनाच्या वापरातही लक्षणीय घट होणार आहे. प्रवासाचा वेळ आणि अंतर कमी झाल्यामुळे वाहनांतून होणाऱ्या उत्सर्जनामध्ये (प्रदूषणात) घट होईल. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण आणि नाशिक कॉरिडॉर्स (मार्गिका) यांच्यात, तसेच गुजरातशी अखंड जोडणी निर्माण होईल.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जैवविविधतेवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही, याबाबत मोठे आव्हान होते. मात्र, हे आव्हान पेलण्यासाठी सर्व यंत्रणा एकदिलाने काम करीत आहेत. विशेष म्हणजे हे काम करताना आजूबाजूच्या नागरिकांना त्रास होणार नाही याची विशेष काळजी घेण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे ठाण्यातील वाहतुकीसाठी थेट पर्यायी मार्ग (Bypass) उपलब्ध होणार असून, घोडबंदर रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे. केवळ 15 मिनिटात ठाणे-बोरीवली हे अंतर पार पडणार आहे. राज्यात शासनाच्या माध्यमातून अनेक विकासात्मक प्रकल्प पूर्णत्वास आले आहेत, या भुयारी मार्गासारखे असे लोकोपयोगी विविध विकासात्मक प्रकल्पही लवकरात लवकर पूर्ण केले जातील.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments