जालना जिल्ह्यातील साहित्यिक चळवळ गतिमान करण्यासाठी एकत्र यावे – राजेश टोपे
जालना/प्रतिनिधी/ येथील यशवंतराव चव्हाण साहित्यिक सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने कर्मयोगी अंकुशराव टोपे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मराठी हिंदी उर्दू या त्रिभाषिक कविसंमेलनात तीस कविंचा पुष्पहार ,स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.या प्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी मंत्री राजेश टोपे म्हणाले ” प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष स्व. अंकुशराव टोपे साहेबांनी हे प्रतिष्ठान जालना जिल्ह्यातील आणि मराठवाड्यातील लेखक, वाचक, विचारवंत, कवी, कलावंत यांच्यासाठी उभे केले आहे. २७ विसावे मराठवाडा साहित्य संमेलन, याची नोंद माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी विशेष दखल घेतली होती. अखिल भारतीय पातळीवरील संमेलनाला लाजवेल असे हे संमेलन घेण्यात आले. बाबा आमटे यांच्या ‘स्वरांनदवन ‘, सुरेखा पुणेकर यांचा विशेष सत्कार यावेळी वीस हजारांच्या वर रसिक श्रोते उपस्थित होते. राज्यसतरीय उत्कृष्ट वाड्मयीन पुरस्कार, मराठी नाटक, विशेष व्याख्याने आयोजित केली होती. हे व्यासपीठ आपल्यासारख्या लेखक, कलावंतांसाठी खुले केले आहे. आपल्या सोबत अनेक उपक्रमाचे साक्षीदार होऊ या.जालना जिल्ह्यातील मान्यवर मंडळी उपस्थित आहे सर्वांचे स्वागत आहे .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठानचे कार्यवाह प्रा बसवराज कोरे यांनी केले. व्यासपीठावर विश्वस्त डॉ.राजेंद्र गायकवाड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दादासाहेब गजहंस, कवी संमेलनाचे अध्यक्ष शिवकुमार बैजल, संजिवनी तडेगावकर, रेखाताई बैजल, जालना मसापचे अध्यक्ष रवींद्र तौर, बाळासाहेब तनपुरे, डॉ . रावसाहेब ढवळे उपस्थित होते.उदूॅ कवी सहा, हिंदी कवी आठ, आणि मराठी पंधरा कविंनी सहभाग घेतला. उर्दू साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रा.अब्दुल अरमान आणि विशेष साहित्यिक उपक्रम राबविले या बद्दल डॉ.यशवंत सोनुने यांचा सत्कार करण्यात आला.
कवी संमेलनात सुनील लोणकर, पंढरीनाथ सारके, प्रभाकर शेळके, विनोद जैमहाल, नारायण खरात, अशोक डोरले, मनिष पाटील,रेखा गतखणे,स्वाती रत्नपारखी, अशोक खेडकर, कृष्णा कदम, पंडित रानमाळ, दिपक राखुंडे, वैशाली फोके, सत्यशिला तौर, एकनाथ शिंदे, दिनेश शेळके, लियाकत अलिखान,बशारत अलिखान, मौलाना अब्दुल फरहान इत्यादी कवींनी आपल्या रचना सादर केल्या.मोठ्या संख्येने श्रौत्यांचा प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज रणधीर यांनी तर आभार शंकर तिकांडे यांनीमानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.अशी माहिती कार्यवाह बसवराज कोरे यांनी सांगितली.