Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादचिंचोली लिंबाजी येथे राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

चिंचोली लिंबाजी येथे राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

चिंचोली लिंबाजी येथे राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

कन्नड/प्रतिनिधी/ कन्नड छत्रपती प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय चिंचोली लिंबाजी येथे २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा या उद्देशाने शाळेत विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेली विविध वैज्ञानिक मॉडेल्स, प्रकल्प व प्रात्यक्षिके सादर करून आपल्या कल्पकतेचा व संशोधन वृत्तीचा परिचय दिला. प्रदर्शनाचे उद्घाटन प्रमुख अतिथी डॉ. टी. पी. पाटील (माजी शिक्षणाधिकारी) यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी डॉ. पाटील यांनी विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिके पाहून त्यांचे कौतुक केले व त्यांना प्रोत्साहन दिले. आपल्या भाषणात त्यांनी विज्ञानामुळे सत्यता पडताळून पाहण्याची संधी मिळते तसेच नवीन विज्ञान व तंत्रज्ञानाच्या विकासातून देशाच्या प्रगतीस हातभार लागतो, असे प्रतिपादन केले. तसेच शिक्षकांनी विज्ञान विषय शिकविताना विविध प्रयोगांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विषय समजावून सांगावा, असे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमास कला विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या अनिता खंडागळे, विक्रमसिंह पवार, पुरुषोत्तम मनगटे, प्राध्यापक वर्ग तसेच शाळेचे मुख्याध्यापक योगेश काथार व प्रवीण पाटील उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रीती उघडे यांनी केले.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments