Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादशाश्वत विकासातूनच मानवाची समृद्धी- डॉ.सोनाजी पतंगे

शाश्वत विकासातूनच मानवाची समृद्धी- डॉ.सोनाजी पतंगे

शाश्वत विकासातूनच मानवाची समृद्धी- डॉ.सोनाजी पतंगे
पाचोड/प्रतिनिधी/ शिवछत्रपती कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,पाचोड येथे पीएम उषा सॉफ्ट कॉम्पोनंट आणि अर्थशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय ३८ व्या राष्ट्रीय अर्थशास्त्र परिषदेचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. या परिषदेस स्वागताध्यक्ष म्हणून संस्थेचे संचालक तथा जिल्हा परिषद सदस्य शिवराज भैय्या भुमरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सोनाजी पतंगे तर उद्घाटक म्हणून डॉ. भारत खंदारे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. योगिता होके पाटील व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ या अर्थशास्त्र परिषदेचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रसेन कोठावळे यांनी केले.अध्यक्षीय भाषणात डॉ. सोनाजी पतंगे यांनी कृषी क्षेत्रातील बदलती परिस्थिती शेतकऱ्यांसमोरील अडचणी आणि त्यावरील उपाययोजना यावर सविस्तर मार्गदर्शन केले. उदारीकरणाच्या काळात शेती क्षेत्रासमोरील आव्हाने अधिक तीव्र झाली असून शाश्वत शेतीचा अवलंब करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.स्वागताध्यक्ष शिवराज भैय्या भुमरे यांनी भारताचा वेगाने होत असलेला आर्थिक विकास अधोरेखित केला. भारत आज जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनत असल्याचा उल्लेख करताना त्यांनी कृषी क्षेत्राचा शाश्वत विकास साधायचा असेल तर मोठ्या प्रमाणावर सिंचन व्यवस्था उभारण्याची आवश्यकता व्यक्त केली. अमेरिकेने भारतावर लावलेला टेरिफ नुकताच मागे घेतल्याने त्याचा सकारात्मक परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अर्थतज्ज्ञांनी शासनाला धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.मराठवाडा अर्थशास्त्र परिषदेचे संयोजन डॉ. शिवाजी यादव यांनी केले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून  कार्याध्यक्ष डॉ. अर्जुन मोरे, सचिव डॉ. विश्वनाथ कोकर, पीएम उषा समन्वयक प्रा. संदीप सातोणकर, तसेच डॉ.साहेबराव खंदारे डॉ. दिलीप अर्जुने आदी मान्यवरांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. ह. सो. बिडवे यांनी केले, तर आभार डॉ. शिवाजी यादव यांनी मानले दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेच्या माध्यमातून अर्थशास्त्रातील विविध समकालीन विषयांवर तज्ज्ञांकडून सखोल चर्चा होणार असून संशोधक व विद्यार्थ्यांना नवे दिशादर्शन मिळणार आहे. या परिषदेच्या यशस्वी ते करिता महाविद्यालयातील डॉ. सुरेश नलावडे डॉ.संतोष चव्हाण डॉ. विलास महाजन डॉ.सुभाष पोटभरे डॉ. भगवान जायभाय डॉ. तुकाराम गावंडे प्रा. विनोद कांबळे प्रा. सचिन कदम डॉ. हेमंत कुमार जैन डॉ. उत्तम जाधव सतीश वाघ प्रा. अरुणा दसपुते प्रा.नितीन चित्ते डॉ. विठ्ठल देखणे आदींनी सहकार्य केले.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments