Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादजिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत भाजपा क्रमांक एक चा पक्ष भाजपा महायुतीच्या...

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत भाजपा क्रमांक एक चा पक्ष भाजपा महायुतीच्या विकासाच्या राजकारणावर ग्रामीण जनतेची विश्वासाची मोहर भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांचे प्रतिपादन

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत भाजपा क्रमांक एक चा पक्ष

भाजपा महायुतीच्या विकासाच्या राजकारणावर ग्रामीण जनतेची विश्वासाची मोहर

भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांचे प्रतिपादन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या विकासाच्या राजकारणावर मतदारांनी विश्वासाची मोहर उमटवल्यामुळे 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समिती निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपा नंबर एक चा पक्ष ठरला आहे. भाजपा महायुतीला घवघवीत यश मिळत असताना अनेक ठिकाणी काँग्रेस भुईसपाट आणि उबाठा गटाचा धुव्वा उडाला आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी सोमवारी केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा तसेच स्व.अजितदादा यांच्या राष्ट्रवादीची कामगीरी उत्तम झाली आहे. ग्रामीण भागाचा चेहरामोहरा महायुती सरकारच्या कार्यकाळात बदलत असून  ग्रामीण विकासाचा नवा अध्याय सुरू झाल्याचेही त्यांनी नमूद केले.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव घेण्याचा अधिकार राऊतांना नाही.

 

राहुल गांधी यांनी सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला आहे त्यांचा निषेध व्यक्त करण्याचे धाडस ज्यांच्यात नाही त्या राऊतांना स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल चकार शब्द काढण्याचा अधिकार नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सन्मान करण्याचे काम केंद्रातील भाजपा एनडीए सरकारने सातत्याने केले आहे. स्वा. सावरकरांबद्दल अपशब्द वापरून अपमान करणा-यांना वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी जोड्यांनी मारले असते अशीही पुस्ती जोडली.

राऊतांना संघ नाही पण पाकिस्तान कळतो

देशभक्ती, राष्ट्रवाद जागवण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि स्वयंसेवक तब्बल 100 वर्षे काम करत आहेत. संघ हा चारित्र्यवान पिढ्या घडवण्याचे काम करतो. राऊतांची संघ कळण्याची बौद्धिक कुवत नाही म्हणूनच ते संघावर बिनबुडाचे आरोप करतात. पाटकर फाइल्समधून राऊत चारित्र्यहीन, कलंकित आहेत हे दिसून आले आहे. राऊतांना संघ नाही पण पाकिस्तान कळतो असा टोमणा श्री. बन यांनी मारला. बाळासाहेबांची संघ आणि स्वयंसेवकांबद्दल काय भावना होती हे राऊतांनी बाळासाहेब हयात असताना जाणून घ्यायला हवे होते असा सणसणीत टोला श्री. बन यांनी लगावला.

उद्धव ठाकरे आमदारकी वाचवण्यासाठी राहुल गांधींच्या चरणावर उबाठा सेना अर्पण करणार का

आमदारकीची मुदत संपल्यानंतर उद्धव ठाकरेंना पुन्हा विधान परिषदेत जाण्यासाठी काँग्रेसच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. पुढच्या एक दोन महिन्यांमध्ये मुदत संपल्यानंतर उद्धव ठाकरे आपली आमदारकी वाचवण्यासाठी आपला पक्ष सोनिया गांधी, राहुल गांधींच्या चरणावर अर्पण करणार का असा बोचरा सवाल श्री. बन यांनी केला.

देश अमेरिकेचा गुलाम नाही, संजय राऊत काँग्रेसचे गुलाम झाले

अमेरिका- भारत व्यापार करार झाला असून पूर्वी 50% आयात शुल्क होते ते आता 18% झाले  आहे. टॅरिफमधून शेतीला वगळले आहे. शेतीतील अत्यावश्यक गोष्टी अमेरिकेकडून आयात केल्या जाणार नाहीत हे आपल्या सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे. काँग्रेसची गुलामी पत्करल्याने बाष्कळ टीका, आरोप करणे राऊतांना भाग आहे असे श्री. बन म्हणाले.

-मुकुंद कुलकर्णी

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments