Tuesday, March 31, 2026
Homeऔरंगाबादअंबडचे पत्रकार राजेंद्र मोताळे यांना 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार' प्रदान

अंबडचे पत्रकार राजेंद्र मोताळे यांना ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ प्रदान

अंबडचे पत्रकार राजेंद्र मोताळे यांना ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ प्रदान

जालना/प्रतिनिधी/ पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधनाचे निस्वार्थी कार्य केल्याबद्दल ‘दैनिक आधुनिक केसरी’चे अंबड तालुका प्रतिनिधी श्री.राजेंद्र रघुनाथ मोताळे यांना ‘महाराष्ट्र लोक न्यूज चॅनेल’च्या वतीने ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२६’ देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
महाराष्ट्र लोक न्यूज चॅनेलच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून या विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.राजेंद्र मोताळे यांनी गेली अनेक महिन्याच्या पत्रकारितेच्या क्षेत्रात राहून निर्भीडपणे आणि तटस्थपणे लोकशाहीचा चौथा स्तंभ बळकट करण्यासाठी योगदान दिले आहे.त्यांच्या या सेवाभावी कार्याची दखल घेत त्यांना सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी चॅनेलचे मुख्य संपादक गजानन देठे पाटील आणि उप-संपादक योगेश पाटील निकम यांनी मोताळे यांच्या कार्याचे कौतुक केले.”राजेंद्र मोताळे यांच्यासारख्या पत्रकारांमुळे नवोदित पत्रकारांना प्रेरणा मिळते आणि जनसेवेचे व्रत अधिक समर्थपणे पुढे नेता येते,”अशा भावना यावेळी मान्यवरांनी व्यक्त केल्या.
या पुरस्काराबद्दल राजेंद्र मोताळे यांच्यावर अंबड तालुक्यासह सर्वच स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments