Tuesday, March 31, 2026
Homeऔरंगाबादबौद्ध स्मशानभूमीची जागेची फेर दुरुस्ती व गुरु शिष्य वाचनालयाची जागेची नोंद घेण्याची...

बौद्ध स्मशानभूमीची जागेची फेर दुरुस्ती व गुरु शिष्य वाचनालयाची जागेची नोंद घेण्याची मागणी

बौद्ध स्मशानभूमीची जागेची फेर दुरुस्ती व गुरु शिष्य वाचनालयाची जागेची नोंद घेण्याची मागणी

आत्ताच एक्सप्रेस

गंगापूर/प्रतिनिधी/ अविष्कार पोलीस मित्र , माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण संघटना छत्रपती संभाजी नगरच्या जिल्हा कार्यकारिणी सदस्य मा. बबन साठे यांनी ग्रामपंचायत अधिकारी मा. एच. एन. सपकाळ यांना निवेदन दिले. दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की. फतियाबाद येथील ग्रामपंचायत हद्दीतील बौद्ध स्मशानभूमीची जागा आहे. त्या जागेची ग्रामपंचायत कार्यालयात नमुना नंबर आठ ला नोंद आहे. परंतु ती कमी पडत असल्याने पुन्हा तिच्यात १००/१५० फूट वाढ करून फेर दुरुस्ती करण्यात यावी. तसेच क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ( गुरु शिष्य) यांच्या वाचनालयाची नियोजित जागा नामदेव साठे नगर येथे आहे. परंतु त्या जागेची ग्रामपंचायत रेकॉर्डला नोंद नाही त्या जागेची ही ग्रामपंचायत नमुना नंबर आठ ला नोंद घेण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. हे निवेदन अविष्कार पोलीस मित्र , माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण संघटना छत्रपती संभाजी नगरच्या जिल्हा कार्यकारिणी सदस्य मा. बबन साठे यांनी दिले.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments