Wednesday, April 1, 2026
Homeऔरंगाबादराज्यघटनेने धर्म स्वातंत्र्य दिल्यामुळेच लोकशाही टिकली - अरविंद चव्हाण

राज्यघटनेने धर्म स्वातंत्र्य दिल्यामुळेच लोकशाही टिकली – अरविंद चव्हाण

राज्यघटनेने धर्म स्वातंत्र्य दिल्यामुळेच लोकशाही टिकली – अरविंद चव्हाण
डॉ. आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अभिवादन
जालना:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेत विविध जाती आणि धर्माच्या लोकांना न्याय दिल्यामुळे सर्वधर्मीय आपापल्या धर्माचे पालन करण्यासाठीी स्वतंत्र आहेत परंतु अलीकडच्या काळात काही मंडळी कडून जातीयतेचे विष पेरले जात असल्यामुळे समता आणि बंधुत्वाची मोठी हानी झाली असल्याचे जालना जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित दादा ) पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार अरविंदराव चव्हाण यांनी सांगितले.
         जालना शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पार्टीच्या वतीने 6 डिसेंबर 2025 शनिवार रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जिल्हा पक्ष कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता ,  त्यावेळी श्री चव्हाण हे बोलत होते ते पुढे बोलताना म्हणाले की ,  शिव , शाहू , फुले , आंबेडकर यांच्या विचाराने राज्यांमध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हे वाटचाल करीत आहेत या समतेच्या विचारांशी पक्ष कधीही तडजोड करणार नाही अशी भूमिका श्री पवार यांची असल्याचे त्यांनी सांगितले .
       याप्रसंगी जालना शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शेख मेहमूद अभिवादन पर बोलताना म्हणाले की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भारतीय राज्यघटना जगातील आदर्श राज्यघटना आहे राज्यघटना टिकली तरच लोकशाही टिकेल म्हणून घटनेचे संरक्षण करणे हे भारतीयांचे कर्तव्य असल्याचे श्री. शेख म्हणाले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जेष्ठ नेत्या शकुंतला ताई कदम ,अण्णासाहेब चितेकर , मिर्झा अन्वर बेग ,  महिला शहर अध्यक्षा रीकंल तायड , प्रभाकर घेवंदे , सोपानराव तेलगड , आदिंनी अभिवादन पर आपले विचार व्यक्त केले.
       कार्यक्रमच्या प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले याप्रसंगी शितल ताई बारोटे , मनकर्णा ताई डांगे , संगीता नागरगोजे , शिवराज जाधव , बबन गाडेकर , विजय सोनवणे ,शिवचरण  बाळराज , शेख. इमरान बिल्डर , सतीश वाहुळे , सय्यद जावेद अली , शेख.सोहेल , शेख.शोहेब , मिर्झा आमेर , राहुल भगत , गणेश नवपुते , गजेंद्र सुपेकर , ज्ञानेश्वर क्षीरसागर , संतोष निकाळजे आदि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रभाकर घेवंदे यांनी केले .
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments