Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादजैन टॅगच्या अध्यक्षा श्वेता कासलीवाल यांनी केली छत्रपती संभाजीनगर ते कुंथलगिरी पर्यत...

जैन टॅगच्या अध्यक्षा श्वेता कासलीवाल यांनी केली छत्रपती संभाजीनगर ते कुंथलगिरी पर्यत १८५ कि.मी. ची सायकल यात्रा

जैन टॅगच्या अध्यक्षा श्वेता कासलीवाल यांनी केली छत्रपती संभाजीनगर ते कुंथलगिरी पर्यत १८५ कि.मी. ची सायकल यात्रा
छत्रपती संभाजीनगर/प्रतिनिधी/  नेहमी सामाजिक कार्यात अगे्रसर असलेल्या जैन टॅग गु्रपच्या अध्यक्षा श्वेता राजेश कासलीवाल हिने दिगंबर जैन सिध्द क्षेत्र कुंथलगिरी येथे जाउâन भगवंताचे दर्शन घेतले. दिगंबर जैन समाजातील पहिल्या महिला जिने वयाच्या ४१ व्या वर्षी आपल्या जिददीवर तब्बल १८५ कि.मी.सायकल यात्रा केली. दिनांक २८ नोव्हेंबर रोजी शहानुमियॉं दर्गा येथुन सुरâवात करâन थेट बिड येथे १२५ कि.मी.वर जाउâन मुक्काम केला नंतर दिनांक २९ नोव्हेंबर रोजी ६०.कि.मी.अंतर सायकल वर पुर्ण केले. यावेळी त कुंथुलगिरी येथे जाउâन भगवंताची पुजा आरती केली.
यावेळी राजेश कासलीवाल, रौनक ठोले, सचिन कासलीवाल, विजय पाटोदी, संकेत पहाडे यांनी सुध्दा छत्रपती संभाजीनगर ते कुथलगिरी पर्यत साकल यात्रा केली. यावेळी श्श्वेता कासलीवाल यांनी सांगीतले की, जर तुम्ही कोणत्याही गोष्टीची जिदद धरली तर ती पुर्ण होउâ शकते. कुंथलगिरी क्षेत्रा तर्फे साकल स्वारांचे स्वागत करण्यात आले.
आर्यनंदी कॉलनी व छत्रपती संभाजीनगर जैन समाजाच्या वतीने सुध्दा श्वेता कासलीवाल व सायकल स्वारांचे स्वागत व अभिनंदन करण्यात आले. अशी माहिती प्रचार प्रसार संयोजक नरेद्र अजमेरा व पियुष कासलीवाल यांनी एका पत्रकाव्दारे दिली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments