Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादविद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, व्यावसायिक, व्यक्तिगत वृद्धी साठी शिक्षकाची भूमिका संवर्धकांची. ...

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, व्यावसायिक, व्यक्तिगत वृद्धी साठी शिक्षकाची भूमिका संवर्धकांची. डॉ पंकजा वाघमारे छत्रपती संभाजीनगर दिनांक 27 नोव्हेंबर 2025 म. शि प्र मंडळ संचालित देवगिरी महाविद्यालय आणि मराठवाडा इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजि छ. संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या वतीने इफेक्टिव्ह मेंटोरिंग या विषयावर राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदरील कार्यशाळेचे उदघाटन प्रोफेसर डॉ. गुलाब खेडकर यांच्या हस्ते संप्पन झाले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ पंकजा वाघमारे, उच्च शिक्षण सह संचालक, छ. संभाजीनगर यांची उपस्थिती होती तर कार्यक्रम अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अशोक तेजनकर होते.. राज्यस्तरीय कार्यशाळा आरंभी कार्यशाळेचे समन्वयक उपप्राचार्य डॉ गणेश मोहिते यांनी प्राध्यापक विकास कार्यक्रम आणि कार्यशाळा विषय इफेक्टिव्ह मेंटोरिंग या संबंधी प्रास्ताविक पर भूमिका विशद केली. आपल्या उदघाटनपर बीज भाषणात डॉ गुलाब खेडकर यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चा आत्मा विदयार्थी संवर्धन आहे. शिक्षकांची भूमिका केवळ अभ्यासक्रमापुरती मर्यादित नसून विद्यार्थ्यांची शैक्षणिक वृद्धी, व्यावसायिक वृद्धी आणि विकास तसेच व्यक्तिगतवृद्धी मध्ये शिक्षकांची भूमिका अनन्यसाधारण आहे. या मार्गदर्शक भूमिकेतून विद्यार्थ्यांचे सर्वांगीण मूल्यमापन होणार आहे. या प्रभावी मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास तसेच शैक्षणिक, व्यक्तिगत, व्यावसायिक कामगिरीमध्ये आमुलाग्र बदल होण्यासाठी इफेक्टिव्ह मेंटोरिंग ही आजच्या शिक्षण व्यवस्थेची गरज आहे असे प्रतिपादन केले. या उदघाटन समारंभाच्या प्रमुख पाहुणे डॉ पंकजा वाघमारे यांनी उच्च शिक्षण सह संचालक हे मेंटर च्या भूमिकेत आहेत आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 प्रभावी पणे राबवण्यासाठी प्रभावी मार्गदर्शन, तसेच शिक्षकांनी विदयार्थ्यांची जबाबदारी आयुष्यभरासाठी घेतली पाहिजे. यामधून शैक्षणिक,व्यावसायिक,सहाचर्य निर्माण होऊन शिक्षक, विद्यार्थी आणि समाज यातील अंतर कमी होण्यासाठी मदत होईल असे विचार मांडले. आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ अशोक तेजनकर यांनी मेंटोरिंग च्या माध्यमातून शिक्षकांनी विदयार्थ्यांना मूल्य शिक्षण दिले पाहिजे, जीवन कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये विकसित केली पाहिजेत. आजच्या काळात कुटुंबातील सदस्य यांच्यापेक्षा ही शिक्षकांची जबाबदारी वाढली आहे म्हणून मेंटर मेंटी या विदयार्थी केंद्री उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे असे विचार मांडले.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिकव्यावसायिकव्यक्तिगत वृद्धी साठी शिक्षकाची भूमिका   संवर्धकांची. डॉ पंकजा वाघमारे

छत्रपती संभाजीनगर/ शि प्र मंडळ संचालित देवगिरी महाविद्यालय आणि मराठवाडा इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजि संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने  प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या वतीने इफेक्टिव्ह मेंटोरिंग या विषयावर राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होतेसदरील कार्यशाळेचे उदघाटन प्रोफेसर डॉगुलाब खेडकर यांच्या हस्ते संप्पन झालेया प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ पंकजा वाघमारेउच्च शिक्षण सह संचालकसंभाजीनगर यांची उपस्थिती होती तर कार्यक्रम अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अशोक तेजनकर  होते..

राज्यस्तरीय कार्यशाळा आरंभी कार्यशाळेचे समन्वयक उपप्राचार्य डॉ गणेश मोहिते यांनी प्राध्यापक विकास कार्यक्रम आणि  कार्यशाळा विषय इफेक्टिव्ह मेंटोरिंग या संबंधी प्रास्ताविक पर भूमिका विशद केली.

आपल्या उदघाटनपर बीज भाषणात डॉ गुलाब खेडकर यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चा आत्मा विदयार्थी संवर्धन आहेशिक्षकांची भूमिका केवळ अभ्यासक्रमापुरती मर्यादित नसून  विद्यार्थ्यांची शैक्षणिक वृद्धीव्यावसायिक वृद्धी आणि विकास तसेच व्यक्तिगतवृद्धी मध्ये शिक्षकांची भूमिका अनन्यसाधारण आहेया मार्गदर्शक भूमिकेतून विद्यार्थ्यांचे सर्वांगीण मूल्यमापन होणार आहेया प्रभावी मार्गदर्शनामुळे  विद्यार्थ्यांचा  सर्वांगीण विकास  तसेच शैक्षणिकव्यक्तिगतव्यावसायिक  कामगिरीमध्ये आमुलाग्र बदल  होण्यासाठी इफेक्टिव्ह मेंटोरिंग ही आजच्या शिक्षण व्यवस्थेची गरज आहे असे प्रतिपादन केलेया उदघाटन समारंभाच्या प्रमुख पाहुणे डॉ पंकजा वाघमारे  यांनी उच्च शिक्षण सह संचालक हे मेंटर च्या भूमिकेत आहेत आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 प्रभावी पणे राबवण्यासाठी प्रभावी मार्गदर्शनतसेच शिक्षकांनी विदयार्थ्यांची जबाबदारी आयुष्यभरासाठी घेतली पाहिजेयामधून  शैक्षणिक,व्यावसायिक,सहाचर्य निर्माण होऊन शिक्षकविद्यार्थी आणि समाज यातील अंतर कमी होण्यासाठी मदत होईल असे विचार मांडलेआपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य                       डॉ अशोक तेजनकर यांनी मेंटोरिंग च्या माध्यमातून शिक्षकांनी विदयार्थ्यांना मूल्य शिक्षण दिले पाहिजेजीवन कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये विकसित केली पाहिजेतआजच्या काळात कुटुंबातील सदस्य यांच्यापेक्षा ही शिक्षकांची जबाबदारी वाढली आहे म्हणून मेंटर मेंटी या विदयार्थी केंद्री उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे असे विचार मांडले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments