Tuesday, March 31, 2026
Homeऔरंगाबादशाश्वत शेतीला परिमाण देण्यासाठी मध उद्योगाची जोड द्या: - अशोक सिरसे

शाश्वत शेतीला परिमाण देण्यासाठी मध उद्योगाची जोड द्या: – अशोक सिरसे

शाश्वत शेतीला परिमाण देण्यासाठी मध उद्योगाची जोड द्या: – अशोक सिरसे

आत्ताच एक्सप्रेस
गंगापूर/प्रतिनिधी/  गंगापूर तालुक्यातील तांदुळवाडी येथे उमेद अभियान च्या माध्यमातून व ग्रामोदय प्रकल्पाच्या सहकार्याने शेतकरी महिला समूहांना मधुमक्षिका पालन पेट्याचे वितरण नुकतेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणे  प्रकल्प संचालक तथा अतिरिक्त उपमुख्यकार्यकारी अधिकारी श्री अशोक सिरसे , सहाय्यक गट विकास अधिकारी श्री भालेकर, माजी सभापती गंगापूर च्या सौ ज्योतिताई गायकवाड, उमेद अभियान चे प्रमुख श्री झाल्टे ,श्री अविनाश गायकवाड, श्री प्रमोद कांबळे, श्री मोगल बँक ऑफ महाराष्ट्र स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्राचेश्री संपत शेजुळ  या मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करून पेट्याचे वाटप करण्यात आले. त्यात,वाळूज, शेंदूर्वादा, लासुर, व तुर्कांबाद सर्कलमध्ये शेतकरी व महिला समूहांना राष्ट्रीय ग्रामीण जीवांनोत अभियान, भारत सरकार, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान,कृषी आत्मा, महाराष्ट्र खादी ग्रामोद्योग मंडळ, आदींच्या योजनेतून २२ लक्ष रुपये मंजूर झाले असून चारशे शेतकऱ्यांची निवड करण्यात आली. त्यातील एक टप्पा  जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून तांदुळवाडी येथील गोदावरी मधुमक्षिका पालन उत्पादक शेतकरी महिला समूहांना पाच लक्ष रुपये खर्च करून मध पेट्याचे वितरण करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते,कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक श्री अविनाश गायकवाड यांनी केले तर सूत्रसंचालनव आभार श्री अनिल कांबळे यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंचक्रोशीतील संदीप पाटील आकाश विधाते, सरला काकडे आदींनी केले.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments