Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादमहाराष्ट्र राज्य युवक महोत्सव 'इंद्रधनुष्य २०२५' मध्ये मुक्त विद्यापीठाच्या लघुपटासह माती कलेला तृतीय पारितोषिक

महाराष्ट्र राज्य युवक महोत्सव ‘इंद्रधनुष्य २०२५’ मध्ये मुक्त विद्यापीठाच्या लघुपटासह माती कलेला तृतीय पारितोषिक

महाराष्ट्र राज्य युवक महोत्सव ‘इंद्रधनुष्य २०२५’ मध्ये

मुक्त विद्यापीठाच्या लघुपटासह माती कलेला तृतीय पारितोषिक

नाशिक/प्रतिनिधी/  यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठास महाराष्ट्र राज्य युवक महोत्सव ‘इंद्रधनुष्य २०२५’ मध्ये तृतीय क्रमांकाची दोन पारितोषिके प्राप्त झाली आहेत. जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे राज्यभरातील सर्व विद्यापीठांचा सहभाग असलेला हा युवक महोत्सव संपन्न झाला. त्यात ललित कला प्रकारातील माती कला स्पर्धेत चि. वैभव विष्णू गिराम (नांदेड) या विद्यार्थ्यांने तृतीय क्रमांक मिळवला. त्याचप्रमाणे विद्यापीठाच्या ‘प्रतिबिंब’ या लघुपटालाही तृतीय पारितोषिक जाहीर झाले. या यशस्वी लघुपटाच्या निर्मितीमध्ये कु. दिपाली नितीन कलाल, चि. श्रेयश विजय इंगळे, चि. सौरभ सोमनाथ गायकवाड, चि. युनूस इस्माईल शेख, कु. भूमिका बाबाराव भालेराव, कु. सुप्रिया पंढरी गवते आणि कु. साक्षी मिलिंद गवळी या विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. या महोत्सवात संघ व्यवस्थापक म्हणून श्री. सिध्दांत टाक यांनी काम बघितले. विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे, प्र-कुलगुरू प्रा. जोगेंद्रसिंग बिसेन, विद्यापीठ व्यवस्थापन मंडळ सदस्य डॉ. संजीवनी महाले, कुलसचिव डॉ. गोविंद कतलाकुटे, विद्यार्थी कल्याण व बहिःशाल केंद्र प्रमुख डॉ. दयाराम पवार आणि सांस्कृतिक समन्वयक श्री. सचिन शिंदे यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments