Wednesday, April 1, 2026
Homeऔरंगाबादकर्ज व नापिकास कंटाळून शेतकऱ्याने संपवली आपली जीवनयात्रा

कर्ज व नापिकास कंटाळून शेतकऱ्याने संपवली आपली जीवनयात्रा

कर्ज व नापिकास कंटाळून शेतकऱ्याने संपवली आपली जीवनयात्रा

कन्नड/ कन्नड तालुक्यातील शिवराई गावच्या शेतकऱ्याने कर्जाचा डोंगर व अतिवृष्टीने वाया गेलेले पिकास कंटाळून आपला जीवन प्रवास संपवीला आहे.
मौजे शिवराई गावचे शेतकरी भाऊसाहेब कचरू शेंगारे वय वर्षे 62 यांची शिवराई शिवरात गट क्र.55 मधे तीन एकर शेती असुन त्यासह ते मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवीत होते.पण या वर्षी झालेल्या अतिवृष्टीने हाता तोंडाशी आलेला पिकाचा घास होत्याचा नव्हता झाल्याने व त्यात त्यांनी खरीपासाठी काढलेल्या कर्जाचा  डोंगर फेडता येत नसलेमुळे त्यांनी सकाळी ठीक 9 वाजता आपल्या शेतातील जांबाच्या झाडास दोरी बांधून आत्महत्या केली आहे.ही बातमी गावचे पोलीस पाटील गणेश शिंदे यांना समजताच त्यांनी घटनस्थळी धाव घेऊन शेतकऱ्यास झाडावरून खाली उतरविले व उपचारासाठी हतनूर येथील प्राथमिक आरोग्यात नेले असता आरोग्य अधिकारी रहेमान यांनी तपासणी करून मृत घोषित केले.बीट जमादार शिवदास बोराडे पोलीस मित्र संतोष ढोले यांनी पंचनामा केला.तर आरोग्य अधिकारी डॉ.रहेमान यांनी शवविच्छेदन करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात दिले.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments