औरंगाबाद चौफुली येथील हाय मॅक्स तसेच अंबड चौफुली पर्यंतचे पथदिवे बंद असल्याने त्वरित चालू करण्याची मागणी नागरिकांच्या वतीने होत आहे.
अत्यंत गजबजलेला हा चौक अंधारामध्ये असल्याने या ठिकाणी लूटमारीच्या घटना घडतात..
जालना प्रतिनीधी / बबनराव वाघ : शहरातील औरंगाबाद चौफुली येथे महानगरपालिकेने मोठा हायमॅक्स बसवलेला आहे. परंतु कित्येक महिन्यापासून तो बंद असल्यामुळे असून नसून खोळंबा असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. अत्यंत गजबजलेला हा चौक अंधारामध्ये असल्याने या ठिकाणी लूटमारीच्या घटना घडत आहेत. तसेच औरंगाबाद चौफुली ते अंबड चौफुली पर्यंत या बायपास रोडवर पथदिवे बसवण्यात आलेत परंतु हे पथ दिवे सुद्धा कित्येक महिन्यापासून बंद आहेत. वेळोवेळी सामाजिक संघटनांच्या वतीने संबंधित विभागाला याची माहिती देऊनही कोणत्याही प्रकारची दखल संबंधित विभाग घेत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. रात्रीच्या वेळेस औद्योगिक वसाहती मधील कामगार तसेच बाहेर गावाहून आलेले व्यवसायिक यांच्यासाठी मोठे डोकेदुखी ठरत असून पालिकेचे आयुक्त यांनी तातडीने दखल घेऊन हाय मॅक्स आणि पथदिवे चालू करावे अशी मागणी नागरिकांच्या वतीने होत आहे. याविषयी आज दिनांक 3 शनिवार रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास सामाजिक कार्यकर्ते साद बिन मुबारक आणि फिरोज खान यांनी माध्यमांशी संवाद साधत असताना म्हटले की, स्थानिक आमदारांनी सुद्धा याकडे लक्ष द्यावे व आयुक्तांना पथदिवे व हाय मॅक्स चालू करण्यासंबंधी सूचना द्याव्यात अशी मागणी करण्यात आली. यावेळी परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती..