Homeऔरंगाबाद27 डिसेंबरला माळी समाजाच्या उपवर-वधू परिचय मेळावा व सामूहिक विवाह सोहळा

27 डिसेंबरला माळी समाजाच्या उपवर-वधू परिचय मेळावा व सामूहिक विवाह सोहळा

27 डिसेंबरला माळी समाजाच्या उपवर-वधू परिचय मेळावा व सामूहिक विवाह सोहळा

जालना/प्रतिनिधी/ माळी समाजाच्या वतीने आगामी 27 डिसेंबर 2026 रोजी चिखली शहरात कृष्णप्रिय मंगल कार्याल्य व लॉन येथे आयोजित करण्यात येणाऱ्या उपवर-वधू पालक परिचय मेळावा व सामूहिक विवाह सोहळ्याच्या नियोजनासाठी जालना शहरात  शासकीय विश्रामगृह जालना येथे दि. 1 नोव्हेंबर रोजी बैठक घेण्यात येवून, विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. हा मेळावा व विवाह सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी व समाजबांधवांनी एकजुटीने प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.
यावेळी  राष्ट्रीय अध्यक्ष शंकरराव लिंगे, कार्याध्यक्ष रमेशभाऊ हिरळकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बैठकीची सुरुवात महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. यावेळी आगामी मेळावा व सामूहिक विवाह सोहळ्याच्या आयोजनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच पदाधिकाऱ्यांवर सोपविण्यात येणाऱ्या जबाबदाऱ्या, नियोजन आणि कामकाज याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.यावेळी माळी समाजाची सामाजिक, आर्थिक व औद्योगिक क्षेत्रातील प्रगती, तसेच दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर समाजासमोरील विविध प्रश्नांवर उपस्थित विचारवंतांनी आपले विचार मांडले.
यावेळी आयोजन समिती अध्यक्ष श्रीराम झारे, मधुकरराव जाधव, अभय तायडे, केशवराव दळवी, प्रा. दिपक नन्हई, कोषाध्यक्ष श्रीधरराव पुंड, जालना जिल्हाध्यक्ष गणेशराव हरकळ ,   मॉ सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब शिवाजीराव वानखेडे, बबनराव घायाळ, कर्मचारी आघाडी अध्यक्ष रमाकांत वाघमारे, सचिव इंजि. सुरेश खांडेभराड, महिला आघाडीच्या अध्यक्षा मंगलताई खांडेभराड, उपाध्यक्षा संगिता फुलझाडे, शिक्षक आघाडीचे सचिव राजाभाऊ घोडके, सरचिटणीस महेश खरात, शहराध्यक्ष गजानन खांडेभराड, कोषाध्यक्ष कैलास रसाळ, सहसचिव बाबासाहेब गाडेकर, तालुका संघटक रामेश्वर अनारसे, शहर उपाध्यक्ष रुपेश बारवकर, जालना तालुकाध्यक्ष छगन किटाळे, विजय खैरे, रूपेश बारवकर,  मंठा तालुकाध्यक्ष महादेव हजारे,मालतीताई जमधडे, रेखा जमधडे  यांच्यासह  महिला व पुरूष समाजबांधव उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments