Homeऔरंगाबाददुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांची दिवाळी गोड करण्यासाठी संत गजानन महाराज संस्थानचा स्तुत्य उपक्रम

दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांची दिवाळी गोड करण्यासाठी संत गजानन महाराज संस्थानचा स्तुत्य उपक्रम

दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांची दिवाळी गोड करण्यासाठी संत गजानन महाराज संस्थानचा स्तुत्य उपक्रम

किराणा किटचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली; गरजू कुटुंबांना दिवाळीचा आधार
जालना/प्रतिनिधी/ दिवाळी हा आनंद, उत्साह आणि आपुलकीचा सण. मात्र दुष्काळाच्या संकटामुळे अनेक शेतकरी कुटुंबांच्या घरात सणाचा आनंद फिका पडतो. अशा गरजू कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यासाठी श्री संत गजानन महाराज संस्थान, सोनलनगर, जालना यांच्या वतीने यंदा दिवाळीनिमित्त एक आगळावेगळा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
        या उपक्रमांतर्गत दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांना जीवनावश्यक किराणा साहित्याच्या किटचे वाटप करण्यात आले. दिवाळीच्या सणानिमित्त संस्थानच्या वतीने देण्यात आलेल्या या मदतीमुळे गरजू कुटुंबांच्या उदरनिर्वाहाला हातभार लागला असून, त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले. केवळ धार्मिक कार्यक्रमांपुरते मर्यादित न राहता समाजातील दुर्बल आणि गरजू घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचविण्याचा संस्थानचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments