Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादटेंभुर्णीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीची घोषणा; अध्यक्षपदी आशिष पैठणे तर...

टेंभुर्णीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीची घोषणा; अध्यक्षपदी आशिष पैठणे तर सचिवपदी किरण कासारे

टेंभुर्णीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीची घोषणा; अध्यक्षपदी आशिष पैठणे तर सचिवपदी किरण कासारे

टेंभुर्णी/प्रतिनिधी/ येथील बुद्ध विहार येथे आयोजित विशेष बैठकीत यावर्षीची भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती मोठ्या उत्साहात स्थापन करण्यात आली. या बैठकीत सर्वानुमते नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात आली असून, अध्यक्षपदाची धुरा आशिष पैठणे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे:

उत्सव समितीच्या अन्य महत्त्वाच्या पदांवर खालील मान्यवरांची निवड करण्यात आली आहे:

  • अध्यक्ष: आशिष पैठणे

  • उपाध्यक्ष: गणेश म्हस्के

  • सचिव: किरण कासारे

  • कोषाध्यक्ष: शालिक काकडे

  • सहकोषाध्यक्ष: प्रदिप काकडे

  • सल्लागार: संदिप भिसे

मार्गदर्शक व वरिष्ठ मंडळी (कार्याध्यक्ष गट): समितीला मार्गदर्शन करण्यासाठी अनुभवी मंडळाची निवड करण्यात आली आहे, ज्यामध्ये गौतम म्हस्के, गणपत पैठणे, गुड्डु मघाडे, किसनराव मघाडे, सतिष चंदनशिवे साहेब, विजय वरशिल, दिनकर ससाने सर आणि शैलीप्रकाश वाघमारे यांचा समावेश आहे.


कार्यकारिणी सदस्य:

या मोठ्या समितीत गावातील उत्साही कार्यकर्त्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने जितेन्द्र म्हस्के, सुनिल मघाडे, अशोक मघाडे, राहुल जाधव, दिपक शिंदे, संदिप मघाडे, गौतम गायकवाड, विनोद काळे, मिलिंद म्हस्के, विजय म्हस्के, आकाश पैठणे, समाधान मघाडे, सोनु पैठणे, प्रेम हिवाळे, कपिल जाधव, संदिप दांडगे, गौतम कांबळे, राहुल बनसोडे, प्रितम बनसोडे, विशाल जाधव, किरण मघाडे, गौतम चंदनशिवे, सौरभ म्हस्के, अनिल गायकवाड, सुर्यप्रकाश मघाडे, आकाश मघाडे, दिपक मघाडे, भानदास खरात, अभिजीत चंदनशिवे, अक्षय मघाडे, नवनाथ मघाडे, कैलास मघाडे, भिमराव म्हस्के, प्रशांत शिंदे, राकेश जाधव, सुरेश चंदनशिवे, वसंता छडिदार, विठ्ठल छडिदार, विलास पैठणे आणि समाधान छडिदार यांची निवड करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments