Saturday, October 25, 2025
Homeअमरावतीअकोला खाजगी शाळांच्या मनमानीपणे फिस वाढवण्यावर नियंत्रण ठेवा!

 खाजगी शाळांच्या मनमानीपणे फिस वाढवण्यावर नियंत्रण ठेवा!

प्रेस नोट                               दिनांक 14 जून 2025

 

 खाजगी शाळांच्या मनमानीपणे फिस वाढवण्यावर नियंत्रण ठेवा!

जिल्हा उपाध्यक्ष

आम आदमी पार्टी जालना 

खाजगी शाळांच्या फीस  वसुलीवर नियंत्रण ठेवून विद्यार्थ्यांना 

अध्यापनासह मूलभूत सुविधा  वेळेत प्राप्त करून देण्या बाबत

गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती भोकरदन तालुका भोकरदन जिल्हा जालना. यांना आम आदमी पार्टीने दिले पत्र अन्यथा आंदोलनात्मक पवित्रा घेणार!

 खाजगी शाळा मनमानीपणे फिस वाढवतात सर्व साहित्य शाळेतूनच खरेदी करण्याची सक्ती करतात त्यातूनही कमिशन लाटतात. त्याबाबत गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती भोकरदन यांना पत्र देऊन कळविण्यात आले आहे की, नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होत आहे.खाजगी संस्थेच्या शाळा पालकाकडून मनमानीपणे फिस वसूल करतात. त्यावर आपले नियंत्रण असावे. तसेच पहिल्या दिवसापासून विद्यार्थ्यांना  शाळेत जरी बोलवले गेले तरी प्रत्यक्ष अध्यापन सुरू होत नाही. अध्यापन सुरू करण्याबाबत सर्वांना वेळेत सूचना देण्यात याव्यात. अनेक शाळांच्या मध्ये मुत्रीची स्वच्छतागृहांची तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आढळून येत नाही.लाईट व फॅनची व्यवस्था नाही.पावसामुळे वर्गखोल्या गळतात.कर्मचारी असूनही विद्यार्थ्यां कडूनच झाडलोट करून घेतल्या जाते. शाळा सुरू झाल्यानंतर अनेक दिवस विद्यार्थ्यांना वेळापत्रक दिले जात नाही.या सर्व बाबी गुणवत्तेसाठी मारक ठरतात.विद्यार्थ्यांची कुचंबना होते.तरी अशा प्रकारे गैरसोय होऊ नये यासाठी वेळेत  जिल्हा परिषदेच्या शाळेसह सर्व  खाजगी शाळांना सूचना देण्यात याव्यात. विशेषतः सर्व माध्यमांच्या खाजगी शाळांच्या फीस  वसुलीवर नियंत्रण ठेवून विद्यार्थ्यांना अध्यापनासह मूलभूत सुविधा  वेळेत प्राप्त करून देण्यात याव्यात. याबाबत योग्य ती कार्यवाही व्हावी.केलेल्या कार्यवाहीचा अहवाल पाठवण्यात यावा. सहकार्याची अपेक्षा!  योग्य कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे.यावेळी जनार्दन पाटील सोळंके तालुकाध्यक्ष आम आदमी पार्टी भोकरदन, महेजाद खान  शहराध्यक्ष आम आदमी पार्टी  भोकरदन फारुख भाई शहर उपाध्यक्ष आम आदमी पार्टि भोकरदन नाडे साहेब  यांच्यासह पार्टीचे कार्यकर्ते हजर होते

-बोरसे गुरुजी

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments