करे योग रहे निरोग नारादुमदुमला आंतरराष्ट्रीय योग दिनाचा जिल्हास्तरीय योग महोत्सव संपन्न
आत्ताच एक्सप्रेस
गंगापूर /प्रतिनिधी/वाळुज येथील स्वर्गीय युसुफ खान क्रीडा मैदान मनीषा नगर येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाचे जिल्हास्तरीय योग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम आमदार प्रशांत बंब यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटक भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय खंबायते कृषी उत्पन्न बाजार समिती उसाचा सचिन काकडे पाटील, माजी सभापती नंदकुमार गांधी पाटील, पतंजली राज्य कार्यकारणी सदस्य मोना ताई राजपूत, पतंजली जिल्ह्याचे प्रभारी कैलास पवार, जिल्हा सरचिटणीस ज्योतीताई गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी शामसुंदर तुपे, शिक्षण अधिकारी अनिल कुमार, सखदेव मंडळातील सर्व लोकप्रतिनिधी सरपंच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी सर्व शाळा महाविद्यालयांचे मुख्याध्यापक योगशिक्षक योगप्रेमी नागरिक सर्व शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनी चा हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. त्यावेळी योग शिक्षकांचा व गुरुजनांचा पुस्तिका वृक्ष व शाल श्रीफळ देऊन येतोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलन व भारत मातेचे पूजनाने करण्यात आले. त्यावेळी झाडे लावा झाडे जगवा चा नारा देऊन पर्यावरणाचा एक संदेश देण्यात आला. व सुमारे २०० झाडांची लागवड करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक जिल्हा संयोजक तथा पतंजली सहभारी श्री अविनाश गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन कारभारी जाधव यांनी केले. तर सर्व उपस्थित त्यांचे आभार धनराज चव्हाण यांनी मांडले. हा कार्यक्रम एसएससी करण्यासाठी विविध समित्या घटित करण्यात आल्या होत्या. त्यात आयोजन समिती स्वागत समिती कार्यकारी समिती अगदी समितीची स्थापना करण्यात आली.