योग दिनानिमित्त ’योग संवाद’
छत्रपती संभाजीनगर/प्रतिनिधी/ आयुष मंत्रालय, भारत सरकारच्या निर्देशाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातंर्गत येत्या शनिवारी (दि.२१) रोजी सकाळी ११ वाजता आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या मुख्य नाटयगृहामध्ये संपन्न होणाऱ्या ’योग संवाद’ या कार्यक्रमाचे उद्घाटन मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी करणार आहेत, अशी माहिती विभागाचे समन्यवक डॉ.सुहास पाठक यांनी दिली. कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थिती प्रकुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे हे असतील. तरुण वर्गामध्ये वाढता ताणतणाव आणि त्यामुळे होणारे दुष्यपरिणाम याचा गाभिर्याने विचार करुन (दि.२१) रोजी सकाळी ११ वाजता सुरु होणा-या या कार्यक्रमामध्ये शहरातील नामांकित मान्यवर उपस्थित मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये डॉ.चारुलता रोजेकर (योगथेरपी सेंटर), डॉ.उत्तम काळवणे (भारतीय योग संस्थान), डॉ.स्नेहा वेद (प्रसिध्द आहार तज्ञ), डॉ.मकरंद कांजाळकर (मेंदू तज्ञ, माणिक हॉस्पिटल, छत्रपती संभाजीनगर), डॉ.अभय कुलकर्णी (वरद आयुर्वेद चिकित्सा केंद्र, छत्रपती संभाजीनगर), डॉ.प्रदिप गर्गे (होमिओपॅथी तज्ञ, छत्रपती संभाजीनगर व पूणे), आदी मान्यवर ताणतणाव, आजर न होण्यासाठी घ्यावयाची काळजी उदा. थायराँईड, वजन नियंत्रित द्वारा योग्य आहार, मधुमेह व हदयविकार – काळजी व उपाय, मान, पाठ, कंबर आणि विविध मणके व हाडांडे आजार आणि उपाय या विषयावर मार्गदर्शन करुन उपस्थितांशी संवाद साधणार आहेत.
समाजातील सर्व नागरिकांनी कार्यक्रमास उपस्थत राहून लाभ घ्यावा, असे आवाहन योग्यशास्त्र विभागाचे समन्वयक डॉ.सुहास पाठक यांनी केले आहे. योग समन्वय समितीचे डॉ.ओमप्रकाश वाघ, डॉ.सचिन देशमुख, डॉ.शिरीष आंबेकर, डॉ.पेरकर, डॉ.विवेक राठोड, डॉ.वंदिता उपाध्याय, डॉ.प्रशांत पगारे, प्रा.राम कलानी, डॉ.कुलाण दत्ता, डॉ.कावेरी लाड, डॉ.सचिन भुसारी, डॉ.जयदत्त शुक्ला हे काय्रक्रमासाठी प्रयत्नशील आहेत.
