आत्ताच एक्सप्रेस
गंगापूर/ प्रतिनिधी / पतंजली जिल्हा योग समिती ,युवा भारती, भारत स्वाभिमान, व पतंजली किसान पंचायत समितीची बैठक दि (११) जून रोजी बजाज नगर येथील अष्टविनायक मंदिर सभागृहात नुकतीच संपन्न झाली त्यात वाळूज येथील सामाजिक कार्यकर्ते श्री अविनाश गायकवाड यांची पतंजली किसान पंचायत च्या जिल्हा सह प्रभारी पदी निवड करण्यात आली आहे. त्यावेळी व्यासपीठावर संतोष राजपूत,नावसरे, कैलास पवार, शिवाजी दहिवाल, राम भारस्कार, ऍड, तांदुळज,डॉ शैलेश माखनिकर, अंकुश भानुसे, विशाल जाधव, उत्तम सोनवणे, योगेश वाघ, प्रशांत अवले, ऍड गोरे, आनंद सहस्रबुद्धे, श्री वेदपठाक, मोनाताई राजपूत, सचिन मुळे आदि मान्यवर सह असंख्य योगपरिवरतील साधक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यावेळी योग प्रशिक्षण शिबिरे व आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाचे व्यापक आयोजन व्हावे. तसेच पर्यावरण पूरक कार्यक्रमास नागरिकांचा सहभाग वाढवावा विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात यावे अशा सूचना यावेळी करण्यात आल्या. त्यावेळी विविध कमिटीमध्ये मान्यवरांची निवड करण्यात आली. श्री गायकवाड यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.