Saturday, October 25, 2025
Homeऔरंगाबादयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात पंडित दिनदयाळ उपाध्याय जयंती साजरी

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात पंडित दिनदयाळ उपाध्याय जयंती साजरी

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात

पंडित दिनदयाळ उपाध्याय जयंती साजरी

नाशिक/प्रतिनिधी/ येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात पंडित दिनदयाळ उपाध्याय यांची १०९ वी जयंती साजरी करण्यात आली. विद्यापीठ मुख्यालयाच्या प्रशासकीय इमारतीत झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे होते. समाजातील शेवटच्या घटकाचा उत्कर्ष व्हावा असा अंत्योदय विचार पंडित दिनदयाळ उपाध्याय यांनी सातत्याने मांडला असे मा. कुलगुरू यांनी आपल्या भाषणात सांगितले. प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांनी पंडित दिनदयाळ उपाध्याय हे आधुनिक भारतातील एकात्मक मानव दर्शन तत्त्वज्ञानाचे पुरस्कर्ते असल्याचे सांगितले. तत्पूर्वी कार्यक्रमाच्या प्रारंभी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी वित्त अधिकारी तथा प्रभारी कुलसचिव डॉ. गोविंद कतलाकुटे, परीक्षा नियंत्रक श्री. भटूप्रसाद पाटील, विद्यार्थी कल्याण व बहि:शाल केंद्र प्रमुख डॉ. दयाराम पवार, सेवासुविधा प्रमुख श्री. सुनील निकम यांच्यासह विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी, शैक्षणिक संयोजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री. किशोर शिंदे यांनी केले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments