महसुलमंत्र्यांची घोषणा उपसरपंच अनिल राधे कांबळे यांच्या पाठपुराव्याला यश
माजलगाव/प्रतिनिधी/ शासनाच्या वतीने घरकुल लाभार्थ्यांकरीता मोफत पाच ब्रास वाळु बंद करण्यात आली होती ती आता पुन्हा सुरू होणार असल्याची घोषणा महसुल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली असुन यासाठी ब्रम्हगावचे उपसरपंच अनिल राधे कांबळे यांनी उपोषण करत पाठपुरावा केला होता. त्याला यश आले आहे. त्यामुळे घरकुल लाभार्थ्यांच्या वतीने उपसरपंच अनिल राधे कांबळे यांचे आभार मानले जात आहेत.
घरकुल लाभार्थ्यांकरीता मोफत पाच ब्रास वाळुचे वाटप सुरू करण्यात आले होते परंतु मोठा गोंधळ व गैरप्रकार होत असल्याने सदरील वाळु देणे शासनाने बंद केले. परिणामी घरकुल लाभार्थ्यांचे बांधकाम रखडल्याने उपसरपंच अनिल राधे कांबळे यांचेकडे अनेकांनी तक्रारी केल्यानंतर उपसरपंच अनिल राधे कांबळे यांनी याप्रश्नी शासनाचे व महसुल मंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी भर पावसात उपोषण केले. उपोषणकर्त्यांची तब्येत देखील खालावली होती. याबाबत महसुल मंत्र्यांची देखील अनिल राधे कांबळे यांनी भेट घेतली होती. याची दखल महसुलमंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेत विधानसभेत लक्षवेधी मांडली म्हटले की, ज्या ग्रामपंचायती मध्ये ज्या नगर पंचायतीमध्ये, ज्या भागामध्ये वाळु घाट आहेत, नदी, नाल्यांवर वाळु उपलब्ध आहे. अशा ठिकाणांहुन तहसिलदारांनी घरकुलासाठी ऑनलाईन पास जनरेट करून ती पास घरकुल लाभार्थ्यांना तलाठ्यांमार्फत घरोघरी पोहच द्यायची आणि घरकुल लाभार्थ्यांनी आपल्या जवळच्या रेती घाटावरून रेती घ्यायची तहसिलदारांनी त्याला आयडेंटीफाय करून द्यायची यातुन घरकुल लाभार्थ्यांना वाळु उपलब्ध होणार आहे. त्यामुळे उपसरपंच अनिल राधे कांबळे यांच्या केलेल्या उपोषणाची दखल प्रशासनाने घेतली असल्याने शहरासह तालुका परिसरातील घरकुल लाभार्थ्यांनी अनिल राधे कांबळे यांचे आभार मानले आहेत.