Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादविठ्ठलराव अनेराये बसवरत्न पुरस्काराने सन्मानीत

विठ्ठलराव अनेराये बसवरत्न पुरस्काराने सन्मानीत

विठ्ठलराव अनेराये बसवरत्न पुरस्काराने सन्मानीत

देगलूर/प्रतिनिधी/ समता संदेश पदयात्रेच्या समारोप सोहळ्या प्रसंगी मौ. शेळगाव छत्री ता. नायगाव, जि. नांदेड येथील लिंगायत चळवळीतील विठ्ठलराव गंगाधरराव अनेराये यांना अनुभव मंडप बसवकल्याण (कर्नाटक) येथे ‘बसवरत्न’ पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे. समता संदेश पदयात्रेच्या तप पुर्ती सोहळा निमित्त अनुभव मंडप बसवकल्याण येथे समारोपीय कार्यक्रमात बसव भारती व अनुभव मंडप समिती तर्फे समता संदेश पदयात्रेचे संकल्पक, मार्गदर्शक आदरणीय शिवानंद हैबतपुरे सर व सर्व सयोजन समिती कडुन शरण किरण पांडागळे यांना ‘बसवरत्न’ पुरस्कार दिल्याबद्दल बसव भारती व अनुभव मंडप समितीचे शरण विठ्ठलराव अनेराये यांनी धन्यवाद मानले आहेत. हा पुरस्कार सोहळा महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध वक्ते विचारवंत प्रा. राजशेखर सोलापुरे, यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments