शहरासह तालुक्याभरात “गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या! “चा जयघोष करीत गणेश विसर्जन
खुसताबाद/प्रतिनिधी/ खुलताबाद शहरासह तालुक्यात गणपती बाप्पा मोरया-पुढच्या वर्षी लवकर या चा जयघोष करीत शनिवारी (ता. सहा) श्री. गणेश विसर्जन शांततेत व जल्लोषात पार पडले.खुलताबाद शहरासह तालुक्यात प्रशासनाने कडक अंमलबजावणी करीत डी.जे.बंदी घातल्याने विविध मंडळानी ध्वनिक्षेपकावर गाणी लावून तसेच टाळ, मृदंग, ढोल-ताशा, झांज, या पारंपरिक वाद्यांच्या गजरात विसर्जन मिरवणुक जल्लोषात आणि शांततेत पार पडली खुलताबाद शहरात उरूस सुरू असल्याने सलग दुसरया वर्षी गणेश विसर्जन मिरवणुकीचा मार्ग बदलला. शहरातील बाजारगल्लीतील गणेश मंडळ वगळता उर्वरित गणेश मंडळांनी खुलताबाद शहराबाहेरील फुलंब्री रोडवरील सार्वजनिक विसर्जन करण्यात आले. या ठिकाणी प्रशासना तर्फे प्रत्येक गणेश मंडळाच्या अध्यक्षांचे स्वागत तहसीलदार स्वरुप कंकाळ यांनी केले.
यंदाच्या गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस निरीक्षक धनंजय फराटे यांनी सर्व गणेश मंडळातील पदाधिकाऱ्यांना डीजे मुक्त गणेश उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत यंदा सर्व गणेश मंडळांनी शांततेत गणेश विसर्जन केले.
