Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबादविकसीत भारत यंग लिडर डॉयलॉग क्विझ मध्ये युवक-युवतींसाठी ज्ञान, संधी आणि गौरवाचा मंच

विकसीत भारत यंग लिडर डॉयलॉग क्विझ मध्ये युवक-युवतींसाठी ज्ञान, संधी आणि गौरवाचा मंच

विकसीत भारत यंग लिडर डॉयलॉग क्विझ मध्ये युवक-युवतींसाठी ज्ञानसंधी आणि गौरवाचा मंच

जालना/प्रतिनिधी/ मेरा युवा भारत, युवा कार्यक्रम व खेल मंत्रालयाच्या स्वायत्त संस्थेमार्फत देशभरातील युवकांना ऑनलाइन स्वरूपात विविध उपक्रमांमध्ये सहभागी करून घेण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग (VBYLD) क्विझ आयोजित करण्यात आला असून जालना जिल्ह्यातील युवकांचा यात मोठ्या संख्येने सहभाग व्हावा, यासाठी मेरा युवा भारत, जालना मार्फत विशेष प्रयत्न सुरू आहेत.

या क्विझमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक युवक-युवतीला माय भारत पोर्टल तर्फे प्रमाणपत्र देण्यात येणार असून सर्वोत्तम गुण मिळवणाऱ्या स्पर्धकांना विशेष गौरवही केला जाणार आहे. युवकांनी आपल्या ज्ञानाची चाचणी घेण्यासाठी, स्वतःला सिद्ध करण्यासाठी तसेच प्रमाणपत्र मिळवण्यासाठी या क्विझमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे.

क्विझमध्ये सहभागी होण्यासाठी युवकांनी My Bharat Portal https://mybharat.gov.in किंवा दिलेला QR कोड स्कॅन करून नोंदणी करून क्विझ सोडवावा.

“जालना जिल्हा राज्यात सर्वाधिक सहभाग नोंदवणारा ठरावा” या हेतूने युवक मंडळे, शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था तसेच सर्व युवकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन प्रणीत सांगवीकर, जिल्हा युवा अधिकारी, माय भारत, जालना यांनी करण्यात केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments