Tuesday, October 28, 2025
Homeऔरंगाबादविद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच शाळेचे ध्येय

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच शाळेचे ध्येय

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच शाळेचे ध्येय
माजालगाव/प्रतिनिधी/  माजालगाव तालुक्यातील राजेंगांव येथे घडामोडींचे ज्ञान मुलांना व्हावे म्हणून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच शाळेचे ध्येय असते आणि शाळा ही समाजाची प्रतिकृती आहे असे आपण मानतो म्हणून समाजातील सर्व घडामोडींचे ज्ञान मुलांना व्हावे हे अपेक्षित असते भारत देश हा लोकशाही देश असूनलोकशाही सदृढ करायची असेल तर निवडणूक स्वच्छ व पारदर्शक होण्याची गरज असते. त्यासाठी शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना लोकशाही शिक्षण देण्याची आवश्यकता असते. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण यावेत
शाळेतील मुलांना लोकशाही व निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया कळण्यासाठी दरवर्षी हा उपक्रम राबविला जातो. या उपक्रमातून मुलांमध्ये नेतृत्वविषयक गुणवत्ता वाढत आहे. ते लोकशाहीचे ख-या अर्थाने आधारस्तंभ बनण्याची प्रेरणा घेऊ शकतात.शालेय शिक्षणात नागरिकशास्त्र शिकवलं जातं.या हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून तसेच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून नागरिकशास्त्र शिकवण्याचा यशस्वी प्रयोग  राजेंगांव मधील सरस्वती विद्यालय मधील शाळेनं केला आहे. विशेष म्हणजे सरस्वती विद्यालयच्या विद्यार्थ्यांनी निवडणुकीतून आपले प्रतिनिधी निवडले आहेत. नुकतेच ही निवडणूक प्रक्रिया पार पडली.
कशी पार पडली निवडणूक?
कै. वसंतदादा पाटील प्रतिष्ठान संचालित सरस्वती विद्यालय राजेंगांव येथे विद्यार्थी प्रतिनिधी निवडणूक घेण्यात आली. या वेळी विद्यार्थ्यांनी निवडणुकीच्या प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. यात प्रतीक कचरे हा विद्यार्थी प्रतिनिधी तर अदिती तौर ही विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून विजयी झाली. नामनिर्देशन झाल्यावर निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना प्रचारासाठी वेळ देण्यात आला. मतदानाच्या वेळी अगदी निवडणूक कक्षासारखे वातावरण ठेवण्यात आले होते.विध्यार्थ्यानीच मतदान अधिकाऱ्याची जबाबदारी सांभाळली. यात पोलीस कर्मचारी महिला व पुरुष, ब. एल.ओ. या सर्व भूमिका या निवडणुकीत पाहाल्या मिळाल्या. या निवडणुकीत मतदार यादी म्हणून वर्गनिहाय याद्या केल्या व मतदान नोंद वहीवर मतदान केल्याची विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घेतली. मतदान केल्यावर विद्यार्थ्यांच्या बोटास शाई लावण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी तसेच शालेय समिती,  गावाकरांनी मतदानाचा हक्क बजावला. शाळेच्या वतीने विजयी उमेदवाराचा सत्कार करण्यात आला. निवडणुकीचे महत्त्व मुलांना सुरेश सोळंके सरांनी  पटवून सांगितले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक कचरे अशोक निवडणुकीसंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
 विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रियेचे धडे कसे मिळेल, विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रिया कशी असते हे समजून घेण्यासाठी हि निवडणूक घेण्यात आली होती. यामध्ये उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरणे, अर्जांची छाननी करणे, माघार घेणे, प्रचार करणे आणि प्रत्यक्ष मतदान अशा सर्व प्रक्रिया पारदर्शीपणे पार पाडण्यात आल्या. या निवडणुकीत  दहा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. यावेळी विद्यालयातील ३५० विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावला.
   लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आपल्या समस्या सुटतील याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात ही निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली. सकाळी ११ वाजता मतदान प्रक्रियाला सुरुवात करण्यात आली  तर दुपारी ३ वाजता मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आला. विद्यार्थी प्रतिनिधी मध्ये प्रतीक कचरे  ६४ मतांनी निवडून आला तर विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून अदिती तौर ही ४१ मतांनी निवडून आली.  सरस्वती विद्यालय राजेंगांव मधील  विद्यार्थी प्रतिनिधी निवडणूक प्रक्रियेची सर्वत्रच चर्चा होत आहे. ही निवडणूक नितीन पूटवाड सर यांच्या कल्पकतेतून ही निवडणूक पार पडली. या सर्व विजय उमेदवारांना  संस्थेचे अध्यक्ष मा. आमदार राधाकृष्ण होके पाटील  व अशोकराव होके पाटील  सचिव, व शालेय समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्यांनी निवडून आलेल्या प्रतिनिधीला शुभेच्छा दिल्या. ही निवडणुकीत पार पाडण्यासाठी पद्माकर शिंदे, दीपक कवडे, अमर राऊत, मनीषा शिंदे, गणेश महाजन, विशाल सोळंके, अविनाश जाधव, महेश तौर, अशोक रोडगे, चौरे तुकाराम,ओमप्रकाश कचरे,
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments