विजेचा शॉक लागून एकाचा मृत्यू
जालन्यात विजेचा शॉक लागून एकाचा मृत्यू..
जालना शहरातील म्हाडा कॉलनीत घडली घटना..
गजानन शेषराव पाचपंडव (वय 40 वर्ष) असं मयताचे नाव..
जालना/प्रतिनीधी/ जालन्यात विजेचा शॉक लागून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. जालना शहरातील म्हाडा कॉलनीत काल रात्री ऊशिरा ही घटना घडली असून गजानन शेषराव पाचपंडव (वय 40 वर्ष) असं मयताचे नाव आहे. म्हाडा कॉलनीत पालिकेच्या नळाला पाणी आल्याने पाणी भरण्यासाठी मोटर लावत असताना गजानन यांना विजेचा जोराने झटका बसला. या घटनेत त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
दिनांक 21 रोजी महानगरपालिकेनं रात्रीच्या 10.30 वाजल्यानंतर नळाला पाणी सोडलं.. त्यामुळं नळाला पाणी आलं म्हणून झोेपेतून उठून गजानन पाचपांडव हे मोटार सुरु करताना त्यांना जोराचा शाॅर्ट लागला. यातच त्यांचा मृत्यू झालाय. दरम्यान महानगरपालिकेनं दिवसा पाणी सोडलं असत तर अशी घटना झाली नसती असा आरोप नातेवाईकांनी केला
घटनेची माहिती मिळताच कदीम जालना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह शासकीय सामान्य रुग्णालयामध्ये पाठवला रात्री उशीर झाल्याने आज दिनांक 22 रविवार रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास मृतदेहाचे शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. दरम्यान माध्यमांशी संवाद साधत असताना नातेवाईकांनी संताप व्यक्त करत महानगरपालिकेवर खापर फोडले महानगरपालिकेने रात्री बे रात्री नळाला पाणी सोडू नये त्यामुळे असे अपघात होत आहेत सकाळी पाच नंतर जर पाणी सोडले किंवा दिवसभर जरी सोडले तरी अशा दुर्घटना होणार नाहीत असा आरोप नातेवाईकांनी केला.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
कदीम जालना पोलीस अधीक तपास करत आहे.