Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादवीज कर्मचाऱ्यास शिविगाळ; एकावर गुन्हा दाखल

वीज कर्मचाऱ्यास शिविगाळ; एकावर गुन्हा दाखल

वीज कर्मचाऱ्यास शिविगाळ; एकावर गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : वीजपुरवठा का खंडित केला म्हणत महावितरणच्या कर्मचाऱ्यास शिविगाळ करून दुचाकींचे नुकसान करणाऱ्यावर जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. महावितरणचे तंत्रज्ञ राजू हिवाळे हे वीजबिल वसुलीसाठी थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करत होते. एका ग्राहकाकडे 17 हजार 910 रुपयांची वीजबिल थकबाकी असल्याने त्याचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. मात्र वीजपुरवठा खंडित केला म्हणून नीतेश विश्वकर्मा याने शिवीगाळ करून महावितरण कर्मचाऱ्यांच्या दुचाकींचे नुकसान केले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments