Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबादविद्युत खांबाला धडक देऊन नुकसान; कारचालकावर गुन्हा दाखल

विद्युत खांबाला धडक देऊन नुकसान; कारचालकावर गुन्हा दाखल

विद्युत खांबाला धडक देऊन नुकसान; कारचालकावर गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : कारने विद्युत खांबाला धडक दिल्याने वीजपुरवठा खंडित होऊन महावितरणचे 80 हजारांचे नुकसान झाले. याप्रकरणी कारचालकावर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

9 सप्टेंबर रोजी पहाटे 3 वाजून 22 वाजता महावितरणच्या 33 केव्ही सुंदरवाडी उपकेंद्रातून निघणारी ११ केव्ही आर.के. वाहिनी उपकेंद्रातून बंद झाली. त्यानंतर शेंद्रा औद्योगिक शाखेतील तांत्रिक कर्मचाऱ्यांनी सदरील लाईनवरील बिघाडाचा शोध घेतला असता सकाळी 7 वाजता लोकसेवा हॉटेल ते ऑयस्टर शाळेदरम्यान सदरील वाहिनीवरील सिमेंटच्या खांबाला कार धडकलेल्या अवस्थेत आढळून आली. ही माहिती वरिष्ठ तंत्रज्ञ ईश्वर मुळे यांनी दिल्यानंतर सहायक अभियंता संभाजी अथरगण यांनी घटनास्थळी पाहणी केली. सदरील कारचा क्रमांक एमएच-15, एचयू-8815 आढळून आला. सदरील कार खांबाला धडकल्याने खांब तुटून पूर्ण लाईन बंद झाली. खांब तुटल्याने वीजपुरवठा खंडित होऊन महावितरणचे वीजमहसुलाचे अंदाजे 80 हजार रुपयांचे नुकसान झाले. सहायक अभियंता अथरगण यांच्या फिर्यादीवरून चिकलठाणा पोलिस ठाण्यात कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments