विद्यापीठाच्या सेवेत ’रुग्णवाहिका’ दाखल
छत्रपती संभाजीनगर :- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सेवेत अत्यधुनिक अॅम्ब्यूलन्स (रुग्णवाहिका) दाखल झाली आहे. यावेळी स्टेट बॅक ऑफ इंडिया महाराष्ट्राचे उपमहाव्यवस्थापक चंद्रशेखर रच्या यांची प्रमुख उपस्थिती होती. मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य केंद्रात हा सोहळा झाला.
विद्यापीठातील विद्यार्थी, कर्मचारी व शिक्षकांसाठी ’रुग्णवाहिका’ व यंत्रसामुग्री उपलब्ध व्हावी यासाठी मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांनी स्टेट बॅक ऑफ इंडियाकडे प्रस्ताव मांडला होता. बँकेने सकारात्मक प्रतिसाद देऊन रुग्णवाहिकेसह १८ लाखांची यंत्रसामुग्री उपलब्ध करुन दिली. यामध्ये मारुती इको अॅम्ब्यूलन्स व्हॅन, कॉन्किडन्ट डेन्टल चेअर, ऑटोमेटॉलॉजी अॅनालाझर व १२ लीड इसीजी मशीनचा समावेश आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवानिमित्त या सामुग्रीचे शुक्रवारी आरोग्य केंद्रात लोकार्पण करण्यात आले. यावेळी उपमहाव्यवस्थापक चंद्रशेखर रच्चा, प्रादेशिक व्यवस्थापक श्री.त्रिभुवन, राहुल शर्मा, रविंद्र सरडे, निलेश साखरे, शाखा व्यवस्थापक विनय राऊत, प्रियंका यादव यांची उपस्थिती होती. मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली होते. यावेळी प्रकुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर, लेखा विभागाचे उपकुलसचिव डॉ.संजय कवडे, आरोग्य अधिकारी डॉ.आनंद सोमवंशी यांची उपस्थिती होती. आगामी काळात देखील विद्यापीठास ’सीएसआर’ निधी उपलब्ध करुन देऊ, असे चंद्रशेखर रच्चा म्हणाले. तर चालू अर्थसंकल्पात आरोग् केंद्रासाठी ५० लाखांची तरतूद केल्याचे मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी म्हणाले. डॉ.संजय शिंदे यांनी सूत्रसंचालन तर डॉ.आनंद सोमवंशी यांनी आभार मानले. यावेळी अधिष्ठाता डॉ एम डी शिरसाठ, डॉ बाबुराव सोमवंशी, डॉ कैलास पाथरीकर, रवींद्र काळे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी डॉ.नेहा मेनकुदळे, डॉ.रोहित वैष्णव, स्मिता पाईकराव, निर्मला खरात, शगीर शेख, जगन गायकवाड आदींनी प्रयत्न केले.