विभागीय आयुक्तांकडून महाराष्ट्र दिन पुर्वतयारीबाबतचा आढावा
छत्रपती संभाजीनगर, दि. 24 :- महाराष्ट्र दिनानिमित्त 1 मे रोजी देवगिरी मैदान, पोलीस आयुक्त कार्यालय येथे ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सबंधित विभागाने आपल्याला सोपवलेली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी समन्वयाने कामकाज करावे, अशा सूचना विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी आज दिल्या.
विभागीय आयुक्त कार्यालयात महाराष्ट्र दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमाच्या पुर्वतयारीची बैठक विभागीय आयुक्त श्री. गावडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या आयोजनाबाबतची सविस्तर चर्चा झाली.
बैठकीच्या प्रारंभी अपर आयुक्त खुशालसिंह परदेशी यांनी कार्यक्रमाच्या कामकाजाबाबत माहिती दिली. महसूल, पोलीस आयुक्त कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, महानगरपालिका, प्रादेशिक परिवहन विभाग यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
