वाळवणी पदार्थ करण्यासाठी महिलांची लगभग सुरू

0
119
वाळवणी पदार्थ करण्यासाठी महिलांची लगभग सुरू
ग्रीष्म ऋतूतील महिलाचा घरगुती उद्योग जोमात
सोयगाव / प्रतिनिधी/अरे संसार संसार ,,,, या बहिनाबाईच्या कविते प्रमाणे महिलांना घरात काय हवय काय नको ? याची नेहमी चिंता असते . म्हणूनच तालुक्यातील सोयगावसह  ग्रामीण भाग व  परिसरात महिलांची वाळवणी पदार्थ बनवण्यासाठी लगभग सुरू झाली आहे .
   महाराष्ट्रात पुर्वी शेती मशागतीतुन उसंत मिळताच व पुढे लग्न कार्य आसल्यास किंवा हातचे पदार्थ म्हणून गव्हापासून शेवया , कुरर्डया ,बाजरी पासून खारोड्या,वडे, ज्वारी पासून पापड , तांदळापासून पापड , चकल्या,उडीदापासुन वडे ,पापड, मुंगाचीदाळ  मुंगवडया , बटाट्या पासून चिप्स , चकल्या ,शाबुदाना चिप्स , चकल्या आदि वाळवणाचे पदार्थ वर्ष भर घरात वेग वेगळ्या वेळी किंवा सणावारा सह उपवासासाठी तळून वापरले जातात . हा वाणोळा प्रत्येक घरात असावेत हया साठी महिलांची धडपड असते . पुर्वी सर्व खरीप _ रब्बी पिके घरात काढून आणल्यानंतर  ग्रिष्मरुतु मध्ये शेती मशागत कामे थांबताच महिला या उन्हाळी वाळवणी पदार्थ बनवण्यासाठी कामाला लागतात . हा उदयोग एकटी – दुकटीला जड वाटत असल्याने ऐक मेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ ,,, या उक्ती प्रमाणे हेळून मेळून शेजार पाजारनी एकत्र येऊन हा उद्योग सुरू होतो . शहरात यंत्र उद्योग उपलब्ध व बाजारात तयार मिळत असल्याने आणि आता यंत्र बचत गटांच्या समुह उदयोगातुन उपलब्ध होत असल्याने विकत घेतात परंतु ग्रामिण भागात महिला घरीच तयार करत असतात . आता शेवया तयार करण्याचे यंत्र आले असून त्यामुळे रोजगार तयार झाला आहे . तर काही महिला रोजंदारी वर मदत करत असल्याने त्यांना रोजगार मिळाला आहे पूर्वी शेवया फळी पाटावर केल्या जात असत त्याची चव व पध्दत वेगळीच होती .
मी पुर्वी हात साच्याने घरीच पापड , शेवया  आदीसह पदार्थ केले जात होते पण काही महिलांनी  स्वतः च्या व बॅकेच्या आर्थिक सहकार्यातुन शेवया , पापड मशीन घेतले.त्या मशीन द्वारे दिवसाकाठी ३०/३५ किलो शेवया घरची कामे सांभाळून तयार करतात प्रती किलो १५ रूपयाप्रमाणे मिळतात.त्यामुळे ४५० ते ५०० रूपये मिळतात यात रोजंदारी व विद्युत बिल मशीन घसाई वजा २५० ते ३०० रूपये प्रति दिन चांगले  उत्पन्न ही मिळु लागले आहे.
-सुनिताबाई पगारे
महीला उद्योजिका आमखेडा- सोयगाव*
ज्या ज्या घरी या वर्षी  लग्न कर्तव्य आहे त्या घरी लग्नासाठी कुरर्डया , पापड रूखुतासाठी लगातात यासह अनेक पदार्थ लगिन घरी करण्याचे सुरु झाले आहे. म्हणुन वाळवणी पदार्थ बनवण्याची लगभग सुरू आहे . घरी परिश्रमाने बनवलेल्या पदार्थाची चव वेगळीच असते . व उन्हाळ्याचे दिवस ही सुखद निघुन जातात . सध्या  या कामात घरातील महिलाना  सासू, जावा, भावांची, शेजारच्या बाईची चांगलीच मदत मिळते
-निर्मलाताई तायडे