वेताळवाडी धरणातील गाळ काढा, शहरप्रमुख रविंद्र काटोले यांची खासदार कल्याण काळे यांच्या कडे मागणी.
आत्ताच एक्सप्रेस
सोयगाव /प्रतिनिधी/ शहरासह पाच गावाची तहान भागविणारे वेताळवाडी धरणातील गाळ काढण्याची मागणी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख यांनी दि (१३)रोजी संत ज्ञानेश्वर महाविद्यालय सभागृहात केली. सोयगाव सह वेताळवाडी गाव,गलवाडा,आमखेडा,रामजीनगर,रमाबाई कालनी,शिवाजीनगर,शेदुर्णी(ता जामनेर)या पाच गावातील नागरिकांना वेताळवाडी धरणाच्या जलाशय मधून पाणीपुरवठा करण्यात येते मात्र सन १९७१पासुन आज पर्यंत एकदाही वेताळवाडी धरणातुन गाळ काढला नाही त्यामुळे वेताळवाडी जलाशय कमीतकमी पंचाहत्तर टक्के गाळ साठला आहे अनेक वेळा विविध पक्षाच्या वतीने मागील पालकमंत्री, आमदार केंद्रीय मंत्री, खासदार यांच्या कडे वेताळवाडी धरणातुन गाळ कोणत्याही नेत्यांनी काढला नाही त्यासाठी प्रयत्न ही केले नाही त्यामुळे नवीन खासदार म्हणून तालुक्यातील मतदारांनी रावसाहेब दानवे हाटुन डॉ कल्याण काळे यांना लाखोंच्या परकाणे निवडून दिले आहे आतातरी नवनिर्वाचित खासदारांनी लक्ष देऊन वेताळवाडी धरणातुन गाळ काढावा अशी आपेक्षा गावातील नागरिक करीत आहे. तसेच
श्री संताजी महाराज जगनाडे मंदिर व तेली समाज सभागृह परिसरात संरक्षण भिंती करिता निधी उपलब्ध करून देण्याची मागणी खासदार डॉ कल्याण काळे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे तेली समाज बांधवांनी केली आहे.
सोयगाव गलवाडा रोडवर श्री संताजी महाराज श्री कडोजी महाराज यांचे मंदिर काम तसेच तेली समाज सामाजिक सभागृहाचे बांधकाम प्रगतीपथावर आहे.त्या परिसराला संरक्षण भिंतीची गरज असून त्याकामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा यासाठी आज दि १३ तेली समाजाच्या वतीने खासदार डॉ कल्याण काळे यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.तेली समाजाचे अध्यक्ष राजू दुतोंडे, सचिव मंगेश सोहनी, उपाध्यक्ष कैलास पंडित,सुधाकर सोहनी,कृषिभूषण अरुण सोहनी, गणेश क्षीरसागर आदींनी हे निवेदन दिले यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष राजेंद्र काळे, माजी आमदार नामदेव पवार, दिनेश हजारी, डॉ इंद्रसिंह सोळुंके, रवींद्र काळे, रविद्र काटोले दिलीप मचे आदी उपस्थित होते.
चौकट..वेताळवाडी धरणाची उभारणी कै माजी मंत्री बाबुराव काळे यांनी सन १९७१/७२मध्ये केली होती त्यावा पासून आज पर्यंत एकदाही वेताळवाडी धरणातून गाळ काढला नाही कोणत्याही धरणातून गाळ काढण्यासाठी शासनाकडून डी पी डीसी मधुन निधी ही उपलब्ध होत असते तरीसुद्धा कोणत्याही आमदार खासदार मंत्री यांनी पर्यंत केले नाही त्यामुळे धरणामध्ये पाणी कमी गाळ जास्त प्रमाणात आहे तसेच शहरातील तसेच पाच गावातील लोक संख्येत झपाट्याने वाढत असुन लवकर गाळ काढण्यात यावा….रविंद्र काटोले शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख सोयगाव.