वेरूळ लेणी येथे या खाजगी सुरक्षा एजन्सी हायअलर्ट मोडवर
जगप्रसिद्ध वेरुळ लेणीमध्ये पर्यटकांची तपासणी, पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क
खुलताबाद /प्रतिनिधी/ खुलताबाद तालुक्यातील जगप्रसिद्ध वेरूळ लेणी येथे पर्यटकाची तपासणी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे नुकताच झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर देशभरात सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.याच पार्श्वभूमीवर भारतीय पुरातत्व विभागाने वेरुळ लेणी येथे ही सुरक्षा वाढवली आहे. रविवारी वेरुळ लेणी परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती दरम्यान सुरक्षा रक्षकांकडून लेणीच्या प्रवेश द्वारावर पर्यटकांची झाडा झडती घेऊनच आत मध्ये प्रवेश देण्यात येत होते.
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जगप्रसिद्ध वेरुळ लेणीमध्ये देशी-विदेशी पर्यटक येत असतात. तथापि,रविवारी प्रवेश देताना प्रत्येक पर्यटकाची कसून तपासणी करण्यात येत असून संशयास्पद व्यक्तींवर विशेष लक्ष ठेवले जात आहे.
भारतीय पुरातत्व विभाग यांच्या कडून तपासणी मोहीम राबवली जात असून कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सतर्क आहे.पर्यटकांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.वेरुळ हे जागतिक वारसा स्थळ असल्याने येथे देशी-विदेशी पर्यटकांची वर्षभर मोठी वर्दळ असते. रविवारीही हजारो पर्यटक वेरुळ लेणी परिसरात दाखल झाले होते.गर्दीच्या विचाराने सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत.भारतीय पुरातत्व विभागाच्या निर्देशा नुसार एसआयएस (SIS) सुरक्षा रक्षकांच्या वतीने प्रवेशद्वारीवर प्रत्येक पर्यटकाची कसून तपासणी करण्यात येत आहे तसेच संशयास्पद हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
विशेष म्हणजे तपास कामी मेटल डिटेक्टर व इतर उपकरणांचा वापर करण्यात आलेला नाही, फक्त झाडांची झाडणी करून तपासणी केली गेली.कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षा कर्मचारी दिवसभर दक्ष राहिले.
