Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबादवेरूळ घाटात आयशर व ट्रकचा भीषण अपघात;दोन ठार, वेरुळ घाटातील रहदारी ठप्प

वेरूळ घाटात आयशर व ट्रकचा भीषण अपघात;दोन ठार, वेरुळ घाटातील रहदारी ठप्प

वेरूळ घाटात आयशर व ट्रकचा भीषण अपघात;दोन ठार, वेरुळ घाटातील रहदारी ठप्प
जड वाहतुकीसाठी रस्ता बंद असताना वाहतूक राजरोसपणे सुरू, पोलीस प्रशासनाचा कानाडोळा”
 वेरूळ येथील सामाजिक कार्यकर्ते शेख मसियोदिन सौदागर यांनी घटनास्थळी धाव घेऊन या अपघातात मृत्यू झालेले कचरू त्रिभुवन व त्यांच्या सासू चंद्रभागाबाई भालेराव यांना घेऊन खुलताबाद येथील ग्रामीण रुग्णालयात दाखिल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
खुलताबाद/प्रतिनिधी/ खुलताबाद तालुक्यातील वेरुळ घाटात गुरुवारी (ता.११) दुपारी चारच्या दरम्यान आयशर व ट्रक यांच्या  समोरासमोर झालेल्या धडकेत आयशर वरील कंटेनर दुचाकीला धडकुन त्याच्यावरील सासू व जावई जागीच ठार झाल्याची घटना घडली,यातील मयताची नांवे कचरू सांडू त्रिभुवन वय ४० वर्षे व  चंद्राबाई आसाराम भालेराव वय ५७ वर्षे दोघेही रा.वेरुळ अशी आहेत.यामुळे वेरुळ घाटातील रहदारी ठप्प झाली आहे. या बाबत अधिक माहिती अशी वेरूळकडुन खुलताबादकडे जाणारा आयशर ट्रक क्र. एम.एच.४२ ए.क्यु.९६४६ तर खुलताबादहून वेरूळकडे येणारा ट्रक क्र.एम.एच.४० सी.क्यु. यांची समोरासमोर धडक झाली.या धडकेत आयशर मध्ये ठेवलेला लोखंडी बायलर खाली पडून आडवा झाला व त्याचवेळी बाजूने   दुचाकीवरुन क्र.एम.एच.जी.पी.१४०४ वरुन वेरुळला जात असलेले सासू व जावई बॉयलरखाली येऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर घाटात वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे. घटनेची माहिती मिळताच खुलताबाद पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत आणि मृतदेह ताब्यात घेऊन वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत,घाट पुर्णपणे जाम आहे.
वेरुळ घाटातून जड वाहनांना वाहतुकीसाठी बंदी असतांना देखील एवढा मोठा बॉयलर व ट्रक यांना जाण्याची परवानगी कशी मिळाली,त्यामुळेच ही दुर्घटना घडली असून, स्थानिक महामार्ग पोलीस व स्थानिक पोलीस पोलीस दुर्लक्ष करीत असल्याने हा अपघात झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते सतीश लोखंडे यांनी केली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments