वेरुळ दर्शनासाठी आलेल्या महिलेचा अनोळखी व्यक्तीकडुन पाठलाग,खुलताबाद पोलिसांत तक्रार दाखल
खुलताबाद /प्रतिनिधी/ खुलताबाद तालुक्यातील वेरुळ येथे दर्शनासाठी आलेल्या एका महिलेचा अनोळखी व्यक्तीने पाठलाग करत त्रास दिल्याची घटना रविवारी (ता.२९) रोजी घडली.
या प्रकरणी पीडित महिलेने खुलताबाद पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
या बाबत तक्रारीत दिलेला तपशील असा आपण रविवारी (ता. २९) रोजी सकाळी नऊ वाजता श्री घृष्णेश्वर मंदिर,वेरुळ येथे दर्शनासाठी आले होतो.दर्शना नंतर सकाळी ११ वाजता त्या मंदिरासमोर बसची वाट पाहत उभ्या होत्या.त्यावेळी एक अनोळखी व्यक्ती काळ्या रंगाच्या होंडा शाईन मोटारसायकलवर (क्रमांक एम.एच.२० एफ.एक्स १९३२) त्यांच्याजवळ येऊन वारंवार “किधर जाना है?”असे विचारू लागला.महिलेने दुर्लक्ष करत जवळील दुकानात गेल्यानंतरही त्या व्यक्तीने पाठलाग सुरूच ठेवला.बसस्टँडवरही तो मोटारसायकलवरून फेऱ्या मारत होता.
सदर व्यक्तीचा रंग गोरा,सरळ नाक,मध्यम केस,बारीक दाढी, अंगात ऑरेंज रंगाचा टी-शर्ट व निळ्या रंगाच्या बाह्या असल्याचं वर्णन पीडित महिलेने तक्रारीत नमूद केलं आहे.फोटो काढण्यासाठी महिलेने मोबाईल काढताच तो तेथून निघून गेला.
घरी पोहोचल्यानंतर महिलेने हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधून संपूर्ण घटना सांगितली.त्यांच्या सल्ल्यानुसार सोमवारी (ता.३०) त्यांनी खुलताबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
महिलेने स्पष्टपणे सांगितले की,सदर व्यक्ती समोर आल्यास ती त्याला ओळखू शकते.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोटारसायकल क्रमांकाच्या आधारे तपास सुरू आहे.
दरम्यान पर्यटनस्थळी सुरक्षिततेसाठी उपाययोजना आवश्यक असुन पर्यटन व धार्मिक स्थळी महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे,वेरुळ परिसरात पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी पर्यटक व नागरिकांकडून होत आहे. या घटनांची तपास पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास बीट जमादार सुदाम साबळे हे करत आहे
