वेरूळ येथील श्री हरिहरातमक रुख्मिणी पांडुरंग मंदिराचा भुमिपुजन सोहळा
खुलताबाद /प्रतिनिधी /खुलताबाद तालुक्यातील वेरुळ येथे बुधवारी (दि.३०) प.पु.आक्काताई महाराज नाथ आश्रम वेरूळ, ह.भ.प.विनोद महाराज टोपरे व गंगापुर खुलताबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत बंब यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री हरिहरात्मक रुक्मिणी पांडुरंग मंदिराचे भुमिपुजन संपन्न झाले.
वेरूळ येथील श्री हरिहरातमक रुख्मिणी पांडुरंगाची मुर्ती एका चौथऱ्यावर खुल्या जागेत स्थापन केलेली असल्यामुळे लोकांना विनासायास दर्शन होत असे परंतु अनेक भक्तांना तिथे मंदिर असावे असे वाटू लागले.
हरिहरातमक रुख्मिणी -पांडुरंग मुर्ती म्हणजे शिव आणि विष्णू यांचे एकत्रीकरण झालेलं रुप. वैकुंठ चतुर्दशीला हा रुपदर्शनाचा सोहळा सर्वत्र साजरा केला जातो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातच नव्हे तर मराठवाड्यात शिव व विष्णू यांचे मिलन असलेले आगळेवेगळे रुप वेरूळ या ठिकाणी पहावयास मिळते. या वेळी बोलताना आमदार बंब म्हणाले आज अक्षय तृतीया आहे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. धर्म, संस्कृती आणि परंपरेला वंदन करणारा अक्षय्य तृतीयेचा हा पावन दिनी मतदारसंघातील सर्व नागरिकांना शुभेच्छ्या दिल्या.
प.पु.साध्वी आक्का महाराज यांनीही यावेळी सर्व भाविक भक्तांना अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. या उद्घाटन प्रसंगी माजी सभापती भिमराव खंडागळे, भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश वाकळे, तालुकाध्यक्ष प्रकाश चव्हाण, प्रकाश मिसाळ, उपसरपंच विजय राठोड, घृषणेशवर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष योगेश टोपरे, शहराध्यक्ष परसराम बारगळ, माजी उपनगराध्यक्ष सुरेश मरकड,माजी नगरसेवक योगेश सागर गायकवाड च्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
