वेरूळ शिवारात चांगोबा वस्तीत बिबट्याचा खुलेआम वावर; शेतकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण
पाण्याच्या शोधात वन्य प्राणी मानवी वस्तीकडे.
खुलताबाद /प्रतिनिधी/ खुलताबाद तालुक्यातील वेरूळ लेणीच्या पायथ्याशी असलेल्या चांगोबा वस्ती शिवारात रविवारी गट क्रमांक २२ मध्ये पाण्याच्या शोधात आलेला बिबट्या अनेक शेतकऱ्यांना दिसल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पाणीच्या शोधात बिबट्या वेरूळ शिवारातील गट नंबर २ चांगोबा शेती वस्तीकडे येत असल्याच्या घटना सातत्याने वाढत आहेत. उन्हाळ्यात जंगलात पाणी आणि शिकार यांच्या कमतरतेमुळे हे प्रकार घडत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे..वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या बिबट्याचे बंदोबस्त करण्याची मागणी बिबट्याचे दहशत वेरूळ शिवारात चांगोबा वस्तीतील शेतकरी बांधवांनी केली आहे, वनविभागांनी जंगलात जर वन्य प्राण्यांसाठी पाणवठे तयार केले असते,तर अशी प्राणी वस्तीमध्ये शिरकाव केला नसता.त्यामुळे वन विभागाने तातडीने बिबट्याच्या बंदोबस्ताची कार्यवाही करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
सध्या वाढलेल्या उन्हाच्या तीव्रतेमुळे वन्य प्राण्यांना पाण्याची तीव्र गरज भासत आहे. परिणामी,पाण्याच्या शोधात हे प्राणी लोकवस्तीत शिरत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरले वन विभागाने या परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष देऊन वन्य प्राण्यांसाठी पाणवठयाच्या व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.
