वेरूळ फाटा ते आखतवाडा रस्त्याची दुरावस्था
रस्त्यावर खड्डेच खड्डे: वाहनधारक त्रस्त.
खुलताबाद/प्रतिनिधी/ खुलताबाद तालुक्यातील वेरूळ फाटा ते आखातवाडा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्या मुळे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न वाहन धारकांना पडत असून खड्ड् याच्या रस्त्यावरून वाहन चालवताना जीवघेणी कसरत करावी लागत आहे, परिणामी वाहने घसरून अपघात होत आहे. तात्काळ रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.आखतवाडा हे गाव म्हैसमाळ डोंगराच्या पायथ्याशी असुन आखतवाडा, आखतवाडा तांडा, पळसवाडी तांडा, चिंचोली,अजंमपुर, पळसगाव,निरगुडी, पिंपरी,तिसगाव, तिसगाव तांडा आदी गावाच्या नागरिकांना दैनंदिन व्यवहार, कामकाजासाठी याच रस्त्याचा वापर करावा लागतो.शेतकऱ्यांना आपला शेतमाल,भाजी पाला विक्रीसाठी खुलताबाद,छत्रपती संभाजीनगर येथे नेण्यासाठी ही याच मार्गावरून जावे लागत असल्याने या खड्ड् याच्या रस्त्याचा मोठा त्रास होत असून वाहने खराब होत आहे.
