वन्यजीवांचा पाणवठा समर्पण फाउंडेशनच्या पुढाकारातून पुन्हा पुनर्जीवित

0
45
वन्यजीवांचा पाणवठा समर्पण फाउंडेशनच्या पुढाकारातून पुन्हा पुनर्जीवित
सोयगाव /प्रतिनिधी / विजय पगारे / येथील समर्पण फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून ता .२५ मार्च २०२५ रोजी सोयगाव सोयगाव भागातील चीचखोरी परिसरात असलेल्या वन्यजीवांसाठी बनवलेल्या पानवट्याला स्वच्छ व सुशोभीकरण करून पुन्हा पुनर्जीवित करण्यात आले. उन्हाळा सुरू झाला तरीही वन्यजीव पाणवठे कोरडे व अस्वच्छ असल्याचे दिसून येत होते. समर्पण फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी हा पाणवठा पुन्हा पुनर्जीवित करण्याचे ठरवले व वनविभागाच्या मदतीने त्यामध्ये पुन्हा पाणी सोडण्यात आले.
समर्पण फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही मंदिर स्वच्छता अभियान अंतर्गत 5 मंदिरांची स्वच्छता व सुशोभीकरण केले. वृक्षारोपण कार्यक्रम केला. भविष्यातही असेच उपक्रम आम्ही करणार असून असे अनेक पाणवठे स्वच्छ करून प्रशासनाच्या मदतीने त्यांना पुनर्जीवित करणार असल्याचे  समर्पण फाउंडेशनच्या हर्षल हिंदू यांनी सांगितले. या उपक्रमामध्ये अध्यक्ष हर्षल हिंदू, दीपक सोनवणे, सुरेश ताडे, मनोहर आगे, राहुल फुसे, सुदर्शन बारी, सोपान आगे, शंकर मिसाळ, भारत हिरे, कल्पेश चौधरी, संकेत बैरागी, आकाश गव्हाड आणि समर्पण फाऊंडेशन टीम उपस्थित होती.